AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अखेर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी मान्य केली ती गोष्ट, 10 वर्षात..

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर तणाव अधिक वाढला. त्यातच पाकिस्तानचे बारा वाजले आहेत. पाकिस्तानमध्ये अनेक मोठ्या समस्या आहेत. त्यातच आता पाकिस्तानमधील बड्या नेत्याने थेट मोठे विधान केले.

मोठी बातमी! अखेर पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी मान्य केली ती गोष्ट, 10 वर्षात..
Pakistan Home Minister Mohsin Naqvi
| Updated on: Jul 31, 2026 | 11:15 AM
Share

पाकिस्तानमध्ये मोठी अस्थिरता वाढलीये. गेल्या काही दिवसांपासून महागाई आणि आर्थिक दबाव वाढलाय. नागरिक रस्त्यावर येत आहेत. खाण्यापिण्याचेही वांदे आहेत. यादरम्यानच आता पाकिस्तानच्या बड्या नेत्याने तेथील परिस्थितीवर भाष्य केले. पाकिस्तानमधील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी एक धक्कादायक विधान केले. ज्यामुळे पाकिस्तानमध्ये नक्की परिस्थिती काय आहे, हे यावरून पुढे आले. पाकिस्तानच्या शासन व्यवस्थेची पूर्ण वाट लागल्याचे त्यांनी मान्य केले. 70 वर्षे जुनी व्यवस्था कोलमडली असून अपयशी ठरल्याचेही त्यांनी मान्य केले. पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोहसिन नकवी यांनी म्हटले की, तुम्ही मान्य करा किंवा नाही पण आपण अशा शासनमध्ये जगत आहोत, जे पूर्णपणे कोलमडले आहे.

आपल्या देशात असलेली सिस्टम पूर्णपणे बर्बाद झालेले आहे. पूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. जर परिस्थिती हीच राहिली तर पुढच्या 10 वर्षात याच गोष्टींवर चर्चा केली जाईल. गेल्या 70 वर्षांपासून ज्या पद्धतीने कारभार चालत आला आहे, ती पद्धत आता प्रभावी राहिलेली नाही. आपल्या सर्वांनाच लोकशाही हवी आहे, पण लोकशाहीमध्येही तीन-चार प्रकारचे प्रणाली असते. आपण जी व्यवस्था गेल्या 70 वर्षांपासून चालवत आहोत, ती आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकत नाही.

आजही आपण तिथेच अडकलो आहोत. सत्तेमध्ये असताना नकवी यांचे हे विधान तूफान चर्चेत आले.सर्वकाही बर्बाद झाल्याचेही त्यांनी यादरम्यान मान्य केले. नकवी यांनी शासन व्यवस्था कोलमडल्याचे मान्य केले. पाकिस्तान सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जात आहे. लोक रस्त्यावर उतरले आहे. हेच नाही तर पाकिस्तानचे तुकडे पडण्याचेही शक्यता आहे.

तशी भीती संसदेत बोलूनही दाखवण्यात आली. भारताची बरोबरी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. मात्र, कर्जाचा मोठा डोंगर, आर्थिक परिस्थिती बिकड, खाण्याचा तुटवडा ज्यामुळे लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली.

Follow Us
राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना...
Maharashtra Rain Alert | राज्यात पावसाचा हाय अलर्ट! नाशिकला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे...
Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?