AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाचं भीषण रुप समोर, युक्रेननं असा स्फोट घडवला की….रशियाच्या काळजावर घाव कसा केला?

युक्रेनने रशियावर मोठा आघात केला आहे. या हल्ल्यामुळे रशियावर मोठा आघात झाला आहे.

युद्धाचं भीषण रुप समोर, युक्रेननं असा स्फोट घडवला की....रशियाच्या काळजावर घाव कसा केला?
russia and ukraine war update Crimean Bridge
| Updated on: Jun 03, 2025 | 9:02 PM
Share

Russia And Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. या दोन्ही देशांतील युद्ध आता भीषण रुप धारण करत आहेत. कारण गेल्या दोन दिवसांपासून युक्रेनने रशियावर शकडो ड्रोन हल्ले केले अशून अनेक क्षेपणास्त्रंही डागली आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत रशियाचे हजारो सैनिक ठार झाले आहेत. असे असतानाच आता युक्रेनने रशियावर मोठा आघात केला आहे. युक्रेनने 1,100 किलो TNT स्फोटकांचा वापर करून रशियाचा महत्त्वाचा पूल उडवून दिलाय.

क्रिमियन ब्रीजवर घडवून आणला स्फोट

युक्रेनने पुलावर घडवून आणलेला हा स्फोट म्हणजे रशियाला मोठा आघात असल्याचं बोललं जात आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (एसबीयू) या अनोख्या मोहिमेबाबत माहिती दिली आहे. या मोहिमेअंतर्गत युक्रेनने क्रिमियन ब्रीजवर स्फोट घडवून आणला आहे. युक्रेनचा पुलावरील हा तिसरा हल्ला आहे. या तिसऱ्या आणि ताज्या हल्ल्यात मात्र या पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनने यावेळी पाण्याखाली असलेल्या पुलाच्या पिलरवर स्फोट घडवून आणले आहेत.

या पुलाला आहे वेगळे महत्त्व

युक्रेनमधील माध्यमांनुसार तेथील स्थानिक वेळ सकाळी 4.44 वाजता हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला यशस्वी व्हावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून योजना आखली जात होती, असे एसबीयूने सांगितले आहे. क्रिमियन ब्रीजच्या जलमग्न पोलवर हे स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. या पुलाला खिलखिळं करण्यासाठीच हा हल्ला घडवून आणण्यात आलाय. क्रिमियन ब्रिज याला केर्च ब्रिजदेखील म्हटले जाते. या पुलामुळे रशिया आणि क्रिमिया हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळेच या पुलाला फार महत्त्व आहे. क्रिमियाला ताब्यात घेतल्यानंतर रशियाने हा पूल बांधला होता. हा पूल म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने याच पुलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची ने आण केलेली आहे.

याआधी दोन वेळा केले होते हल्ले

युक्रेनने हा पूल खिळखिळा करण्यासाठी याआधी दोन वेळा हल्ले केलेले आहेत. पहिला हल्ला हा 8 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आला होता. तेव्हा या पुलावर एक ट्रकचा स्फोट झाला होता. दुसरा हल्ला हा जुलै 2023 मध्ये झाला होता. या हल्ल्यात पुलाचा काही भाग उद्ध्वस्त झाला होता. दरम्यान, युक्रेनच्या या हल्ल्यानंतर अद्याप रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र युक्रेनच्या हल्ल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता या पुलावरील वाहतूक पुर्ववत झाली होती.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं