मोठ्या जाती संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मी यांना मॅनेज होत नाही, हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. पैसा आणि पदाशी माझं जमत नाही. इंग्रजीशी जमत नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याशिवाय पर्याय नाही. मी खाऊन जगण्यासाठी जन्माला आलो नाही. मी मराठा समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. काहीही झालं तरी हरकत नाही. त्यांना मला शत्रू मांडलं तरी काही हरकत नाही. तुम्ही सोबत असल्यावर मी सरकारला विचारतही नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मोठ्या जाती संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव; मनोज जरांगे पाटील यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 4:57 PM

बीड | 23 डिसेंबर 2023 : देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तुम्ही एकदा प्रयोग केलाय. तुम्हाला अंतरवलीचा प्रयोग भोगावा लागतोय. आता सावध व्हा. कोट्यवधी मराठा एकत्र आला आहे. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल. हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये इशारा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

त्याला संडास लागेल

हे वादळ पाहून येवल्याच्या येडपटाला संडास लागल्याशिवाय राहणार नाही. मुंगीलाही जागा मिळणार नाही, एवढी ताकद मराठा समाजाने दाखवली. मराठा आरक्षण कसं आणतात ते नुसतच पाहा. आपल्याला डाग लागला. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर डाग लावला. कोणी म्हणतंय घरं जाळलीत. कोणी म्हणतंय हॉटेल जाळलंय. आमच्यावर उगाच डाग लावलाय. आम्ही घाबरणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

त्यांना चप्पल दाखवा

नेता वगैरे मानू नका. आपल्यातील लोकांनी काम केलं तरच नेता माना. मराठा असला तरी नेता मानू नका. आता निवडणुकीत जवळ आला तर चप्पलच दाखवा. आपल्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे मुडदे बघता. तुम्हाला लाजा वाटत नाही का? तुमच्या डोळ्यादेखत आरक्षणासाठी मराठ्याचं लेकरू आत्महत्या करत आहे. तुम्ही नुसतं पाहत आहात. एका दणक्यात आरक्षण द्या. नाटकं कशाला? असा सवाल त्यांनी केला.

सरकार झोपू नका

आपल्या पोरांनी काही केलं नाही तरी गुन्हे दाखल केले आहेत. निष्पाप पोरांना अडकवण्याचं काम सरकारने केलं. मराठ्यांना काही करायचं असतं तर आजच केलं असतं. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या संख्येने एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला. शांततेत मैदानात आला. विनाकारण त्याला डाग लावू नका. मराठ्याला विनाकारण डिवचू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.