Bus Accident | इंदोर अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळली, बचाव कार्य सुरु, हेल्पलाइन क्रमांक 09555899091..

Indor Amalner Jalgaon Bus Accident | इंदोरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासनातर्फे बचाव कार्य सुरु असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Bus Accident | इंदोर अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळली, बचाव कार्य सुरु, हेल्पलाइन क्रमांक 09555899091..
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 1:18 PM

जळगावः इंदोरकडून अमळनेरकडे (Indor Amalner Bus Accident) जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस (ST Bus) अचानक नर्मदा नदीत कोसळली. मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीच्या (Narmada River) पुलावर सदर अपघात झाला आहे. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून प्रवाशांच्या नातेवाईकांशी संपर्क करणे सुरु आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

मदतीसाठी इथे करा संपर्क

  • जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष – 02572223180, 02572217193
  • घटनास्थळी मदतीसाठी – 09555899091.
  • एसटी महामंडळाचा संपर्कक्रमांक 022/23023940

कोणत्या बसला अपघात?

Bus No MH40N9848 चालक- चंद्रकांत एकनाथ पाटील 18603 वाहक – प्रकाश श्रावण चौधरी 8755 मार्ग – इंदोर – अमळनेर इंदोर हून सुटण्याची वेळ – 7:30 अपघाताचे ठिकाण – खलघाट अणि ठीगरी मध्ये नर्मदा पुलावर

कशी घडली घटना?

बस नदीत कोसळल्यानंतर 15 ते 20 जण वाहून गेल्याचं सांगितलं जातंय. तर काहीजण पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचले. काहींना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या बसमध्ये जवळपास 55 प्रवासी होते. अजूनही दरीत कोसळलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, नर्मदा नदीवरील पुलाची रेलिंग ओलांडताना ही दुर्घटना घडली. पुलावरून कोसळल्यानंतर ही बस नदी लगतच्या खडकावर कोसळून परत नदीत पडली. या विचित्र अपघातामुळे अनेक जण जखमी झाले. यात बसचा चक्काचूर झाला. अपघातातून बचावलेले प्रवासी जवळपासच्या खडकांचा आधार घेत प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होते. तर काहीजण पोहत किनाऱ्यापाशी पोहोचले. या घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याचा आकडा बचावकार्य पूर्ण झाल्यावरच समोर येईल. तोपर्यंत नागरिकांनी बचावकार्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक एम. एच. 40 एन 9848 ही आज दि. 18 जुलै, 2022 रोजी सकाळी 07.30 वा. इंदोर येथुन अमळनेरकडे मार्गस्थ झाली. आज सकाळी सुमारे 10.00 ते 10.15 च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी खरगोन व धारचे जिल्हा प्रशासन पोहोचले असुन बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत असुन 1 जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करणेत येवुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत, त्यांचे प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती घेणेचे काम सुरु आहे. आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.