Nashik Corona|नाशिकमध्ये दिवसात कोरोनाचे हजारापेक्षा जास्त रुग्ण; काय आहे आजची नेमकी आकडेवारी?

| Updated on: Jan 12, 2022 | 12:29 PM

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ग्रामीणमध्ये 96.63 टक्के, तर नाशिक शहरात 96.26 टक्के, मालेगावमध्ये 96.69 टक्के आहे.

Nashik Corona|नाशिकमध्ये दिवसात कोरोनाचे हजारापेक्षा जास्त रुग्ण; काय आहे आजची नेमकी आकडेवारी?
corona test
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये एका दिवसांत तब्बल एक हजारापेक्षा जास्त कोरोना (Corona) रुग्ण वाढले असून, सध्या जिल्ह्यात 6325 रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 204 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. कोरोनाच्या रुग्णांची काल मंगळवारची संख्या 5 हजार 344 अशी होती. नागरिकांनी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सुरक्षित नियम पाळावेत. एकाच ठिकाणी गर्दी करू नये, प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

येथे आहेत रुग्ण

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 217, बागलाण 37, चांदवड 25, देवळा 24, दिंडोरी 157, इगतपुरी 87, कळवण 29, मालेगाव 15, नांदगाव 64, निफाड 306, पेठ 2, सिन्नर 114, सुरगाणा 6, त्र्यंबकेश्वर 24, येवला 24 असे एकूण 1 हजार 131 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 4 हजार 896, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 65 तर जिल्ह्याबाहेरील 233 रुग्ण असून असे एकूण 6 हजार 325 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 21 हजार 294 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 53, बागलाण 9, चांदवड 8, देवळा 7, दिंडोरी 37, इगतपुरी 26, कळवण 19, मालेगाव 10, नांदगाव 49, निफाड 91, पेठ 1, सिन्नर 21, सुरगाणा 4, त्र्यंबकेश्वर 10, येवला 5 असे एकूण 350 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.63 टक्के, नाशिक शहरात 96.26 टक्के, मालेगावमध्ये 96.69 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.40 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 96.46 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 251 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 30, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या जिल्ह्यात 6325 रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी प्राप्त अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 204 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी

नाशिक जिल्हा लक्षणीय

– 4 लाख 21 हजार 294 कोरोनाबाधित.

– 4 लाख 6 हजार 204 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 6 हजार 325 पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.42 टक्के.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली