AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील काँग्रेसचे माजी खासदार उद्या भाजपात येणार; पश्चिम विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार

अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1975 ते 77 दरम्यान कार्यभार पाहिला. १९७६ ते ७७ या कालावधीमध्ये अकोला जिल्हा खादी बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली.

विदर्भातील काँग्रेसचे माजी खासदार उद्या भाजपात येणार; पश्चिम विदर्भात काँग्रेसला मोठं खिंडार
अनंतराव देशमुख
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 13, 2023 | 4:41 PM
Share

वाशिम : जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा उद्या मुंबईत भाजपात प्रवेश होणार आहे. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. अनंतराव देशमुख यांचा जन्म १९ ऑगस्ट १९४९ रोजी झाला. ते एमएससी गोल्ड मेडलिस्ट पुणे येथून आहेत. अकोला लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1975 ते 77 दरम्यान कार्यभार पाहिला. १९७६ ते ७७ या कालावधीमध्ये अकोला जिल्हा खादी बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली. नंतर 1979 या कालावधीमध्ये विदर्भातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते सर्वाधिक मतांनी निवडून गेले.

दोन वेळा खासदार

अनंतराव देशमुख 1985 मध्ये विधानसभेत कारंजा मतदार संघातून ते आमदार म्हणून निवडून आले. ते राज्याचे वित्त राज्यमंत्री, नियोजन रोजगार हमी योजना माहिती आणि जनसंपर्क खात्याचे राज्यमंत्री होते. लोकसभा निवडणूक 1989 आणि 1991 मध्ये त्यांनी वाशिम मतदार संघातून जिंकली. अनंतराव देशमुख यांचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्यासोबत अतिशय जवळचे संबंध होते.

विदर्भात काँग्रेस रुजवली

अनंतराव देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. यावेळी त्यांनी विदर्भात काँग्रेसची पाळमुळं खोलवर रुजवली. अनंतराव देशमुख यांचे माधवराव शिंदे आणि राजेश पायलट यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांना २००९ वेळी अपक्ष विधानसभा निवडणूक लढली. त्यात थोड्या मतांनी त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.

आझाद यांच्या विजयात मोठा वाटा

२०१९ मध्ये पुन्हा अनंतराव देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपक्ष लढताना त्यांना अगदी थोडक्या मताने पराभवास सामोरे जावे लागले. अनंतराव देशमुख यांनी अकोला जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे कायम सत्ता ठेवली होती. परंतु वाशिम जिल्हा निर्मितीनंतर देशमुख यांनी स्थानिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पाळमुळे रोवली. गुलामनबी आझाद यांच्या विजयात त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली.

३२ वर्षे वाशिम झेडपीत काँग्रेसची सत्ता

वाशिम जिल्हा निर्मितीपासून ते आत्तापर्यंत तब्बल 32 वर्षे वाशिम जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता होती. अनंतराव देशमुख अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असताना दोन्ही जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस सत्तेत होती. ही अनंतराव यांच्या नेतृत्वाची कमाल होती.

पुत्र नकुल देशमुखही भाजपात येणार

पश्चिम विदर्भात असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि हजारो कार्यकर्ते हे त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे विभागात भाजपची ताकद वाढणार आहे. त्यांचे चिरंजीव नकुल देशमुख यांची मतदार संघात युवकांवर असलेली मजबूत पकड आहे. यामुळे भाजप पक्षाला नकुल देशमुख यांच्या रूपाने एक दमदार युवा नेतृत्व ही मिळणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर