Explained: हायसिक्युरिटी स्ट्राँगरूम… GPS ट्रॅकिंग… तरीही कसा फुटला NEET चा पेपर? वाचा Inside Story

Explained NTA NEET UG Exam 2026 Paper leak: डॉक्टर होण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर काल एका पेपर फुटीमुळे पाणी फेरले. इतकी मोठी यंत्रणा असताना, इतकी सुरक्षा असतानाही पेपर कसा फुटतो हाच मोठा सवाल आहे. नीट परीक्षा 2026 रद्द झाल्याने देशभरात संताप व्यक्त झाला. विद्यार्थी आणि पालक NTA वर चवताळले.

Explained: हायसिक्युरिटी स्ट्राँगरूम... GPS ट्रॅकिंग... तरीही कसा फुटला NEET चा पेपर? वाचा Inside Story
NEET ची प्रश्नपत्रिका फुटली कशी?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 13, 2026 | 9:52 AM

NTA NEET UG Exam 2026 Canceled: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. काल NEET UG परीक्षा रद्द करण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 3 मे रोजी ही परीक्षा आयोजीत केली होती. देशातील ही सर्वात मोठी मेडिकल प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेचा पेपर अगोदरच फुटला होता आणि गेसिंग पेपरमधील 135 प्रश्न हे मुख्य परीक्षेत आल्याचे समोर आले होते. CBI ने पेपरफुटीचा तपास हाती घेतला आहे. राजस्थानपासून ते बिहारपर्यंत आणि महाराष्ट्रापर्यंत काल धाडसत्र राबवण्यात आले. नाशिकपर्यंत या पेपरफुटीचे कनेक्शन उघड झाले. पाच राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या. पण लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. NTA ही काही गल्लीबोळातील परीक्षा संस्था नाही. 2018 मध्ये मोदी सरकारने तिची स्थापना केली आहे. तिने आतापर्यंत अनेक परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यातील अनेक रद्द कराव्या लागल्या आहेत. या एनटीएमध्येच पेपरफुटीचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. इतकी अतिसुरक्षा असताना आणि जीपीएस यंत्रणा असतानाही NTA NEET UG Exam 2026 चा पेपर...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us