AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : मोठा दणका! सरकारला जे हवे तेच घडले, सोन्याच्या दरात थेट मोठी वाढ, तब्बल..

Gold Price Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठे आवाहन केले. एक वर्षाकरिता सोने न खरेदी न करण्यावर त्यांनी भर दिला. ज्यानंतर आता मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. सरकारच्या निर्णयानंतर सोन्याचे भाव वाढले आहेत.

Gold Price Today : मोठा दणका! सरकारला जे हवे तेच घडले, सोन्याच्या दरात थेट मोठी वाढ, तब्बल..
Gold Price Today
| Updated on: May 13, 2026 | 9:56 AM
Share

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पुढील 1 वर्षाकरिता सोने खरेदी करण्यास मनाई केली. विशेष म्हणजे त्यांनी 24 तासात दोनदा सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. ज्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत सोन्याचे आयात शुल्क वाढवले. सोन्याचे आयात शुल्क 6 टक्के होते, आता ते वाढून 15 टक्के करण्यात आले. ज्यामुळे धाडकन सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली.  बुधवारी सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. मौल्यवान धातूंची आयात कमी करण्यासाठी आणि देशाच्या परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर आता सोन्याच्या भावांमध्ये मोठी वाढ झाली. नुकताच सोन्याचा आजचा भाव पुढे आला. कालच्या तुलनेत आज सोने महागले आहे. कोणत्याही परिस्थतीमध्ये सरकारला सोन्याची विक्री थांबवायची आहे.

आयात शुल्कात वाढ केल्याने आता मोठा फटका बसलाय. सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. आज 13 मे रोजी सोने आणि चांदी महाग झाले. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 9,000 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,62,648 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव 16,000 रुपयांनी वाढून प्रति किलोग्रॅम 2,65,805 रुपयांवर पोहोचला. हा नक्कीच मोठा दणका म्हणावा लागणार आहे.

जागतिक बाजारातही सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. कॉमेक्सवर सोन्याचा भाव 0.51 टक्क्यांनी वाढून 4,711 वर पोहोचला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होणार हे स्पष्टच आहे. दणक्यात सोन्याचा भाव ,000 रुपयांनी वाढला आहे. सोने खरेदी रोखण्याकरिता सरकारकडून अशाप्रकारची पाऊले उचलली जात आहेत.

भारतीय बाजारात सोन्याचा भाव आता पूर्वीपेक्षा जास्त असणार आहे. थेट मोठे सरकारकडून आयात शुल्क वाढवण्यात आले. ज्याचा फटका बसत आहेत. ग्राहकांना आता सोने खरेदी करायचे असेल तर अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. पुढील 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर लगेचच आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. सोने खरेदीवर अजून काही निर्बंध सरकारकडून घातली जाऊ शकतात.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?