प्रचंड वादग्रस्त आणि अश्लील आरोप असणारं गाणं, ज्यामध्ये संजय दत्तने घाघरा घालून केलेला डान्स, आजही गाणं सुपरहिट
बॉलिवूडमधील 5 मिनिट 23 सेकंदाचं प्रचंड सुपरहिट गाणं. ज्यामध्ये संजय दत्तने घाघरा घालून केलेला डान्स. पण गाणं ठरलेलं प्रचंड वादग्रस्त. देशभरात गाण्यावर घातलेली बंदीची मागणी.

90 चं दशक हे बॉलिवूडमधील दमदार गाणी आणि सुपरहिट संगीतासाठी खास ओळखलं जातं. त्या काळात अशी अनेक गाणी आली ज्यांनी केवळ सिनेमागृहांमध्येच नाही तर लोकांच्या दैनंदिन आयुष्यातही आपली वेगळी जागा निर्माण केली.

रेडिओ, कॅसेट प्लेअर, लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये ही गाणी सतत ऐकू यायची. मात्र, याच काळात एक असं गाणं रिलीज झालं ज्याने देशभरात खळबळ उडवून दिली. गाण्याची धून लोकांच्या ओठांवर चढली, पण त्यातील बोल आणि सादरीकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला.

हे गाणं होतं 1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’. या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकांमध्ये दिसले होते. जवळपास 5 मिनिटे 23 सेकंदांच्या या गाण्याला अलका याज्ञनिक आणि इला अरुण यांनी आवाज दिला होता.

विशेष म्हणजे, सुपरस्टार संजय दत्तने घाघरा घालून केलेला डान्स त्या काळात खूपच वेगळा आणि चर्चेचा विषय ठरला. माधुरी दीक्षितने या गाण्यात आपल्या नृत्यकौशल्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तिच्या एक्सप्रेशन्स आणि डान्स मूव्ह्जने प्रेक्षकांना वेड लावलं.

गाणं सुपरहिट ठरलं, माधुरींचं भरभरून कौतुक झालं, पण दुसरीकडे गाण्याच्या बोलांवरून जोरदार वाद निर्माण झाला. अनेकांनी हे गाणं अश्लील असल्याचा आरोप करत त्याचा विरोध सुरू केला.