
अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. ते आपल्या प्रेमळ क्षणांनी सर्वांची मने जिंकतात. दोघांनी नुकतीच अलिबागमधील त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश पूजा केली.

मीडियारिपोर्टनुसार रणवीर आणि दीपिकाच्या केवळ कुटुंबीयांनीच पुजेला हजेरी लावली होती. रणवीरने त्याच्या इंस्टास्टोरीज गृह प्रवेशचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने त्याचा आणि दीपिकाचा चेहरा दाखवला नाही.

रणवीर सिंगने या फोटोंमध्ये पूजा पद्धतीची झलक दाखवली. यासोबतच त्यांनी पूजे दरम्यानच्या त्यांच्या निखळ क्षणांची झलक दाखवली आहे. रणवीर आणि दीपिका दोघांनीही गृह प्रवेश पूजासाठी पांढऱ्या पोशाखांची निवड केली.

फोटोंमध्ये ते धार्मिक विधी करताना दिसले. पण कोणत्याही फोटोत दोघांचे चेहरे दिसून आले नाहीत

या वर्षी जुलैमध्ये, रणवीर सिंग आणि त्याचे वडील जुगजित सुंदरसिंग भवनानी यांच्या ओह फाइव्ह ओह मीडिया वर्क्स एलएलपी नावाच्या कंपनीने मुंबईत ११९ कोटी रुपयांना अपार्टमेंट खरेदी करण्याचा करार केला.

मीडिया रिपोर्टनुसार हे अपार्टमेंट मधील 16व्या, 17व्या, 18व्या आणि 19व्या मजल्यावर पसरलेले सी व्ह्यू लक्झरी क्वाड्रप्लेक्स अपार्टमेंट आहे. या इमारतीत एकूण 19 पार्किंग स्लॉट आहेत.

फोटोंमध्ये ते धार्मिक विधी करताना दिसले. पण कोणत्याही फोटोत दोघांचे चेहरे दिसून आले नाहीत