
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) कमबॅक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘हंगामा 2’सह शिल्पा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवण्यास सज्ज झाली आहे.

हा चित्रपट 23 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल. सध्या शिल्पा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

शिल्पा शेट्टी वेगवेगळ्या प्रकारे ‘हंगामा 2’ चे प्रमोशन करताना दिसली आहे. शिल्पा आपल्या प्रत्येक स्टाईलने चाहत्यांची मने घायाळ करत आहे.

46 वर्षीय शिल्पा आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टी यांनी गेल्या वर्षांत चित्रपटविश्वापासून अंतर ठेवले आहे. दरम्यान ती छोट्या पडद्यावर दिसली होती. सध्या ती डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डांसर चॅप्टर 4’चे परीक्षण करत आहे.

अशा परिस्थितीत शिल्पाच्या सुपरहिट कमबॅकवर सर्वांचे लक्ष लागले आहे.