Indurikar Maharaj Daughter : यळकोट यळकोट जय मल्हार ! इंदोरीकर महाराजांच्या लेक-जावयाचं जेजुरी दर्शन! Photo समोर

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह अहिल्यानगरमध्ये साहिल चिलप यांच्याशी थाटामाटात पार पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लग्नानंतर नवदाम्पत्याने जेजुरी येथे देवदर्शन करत भंडाऱ्याची उधळण केली. या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: May 07, 2026 | 3:42 PM
1 / 6
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ इंदोरीकर ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या लाडक्या लेकीचं , रविवार 3 मे रोजी थाटामाटात लग्न झालं. अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी येथे झालेल्या सोहळ्यात ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप हे विवाहबद्ध झाले. हजारो लोकांनी या सोहळ्यास हजेरी लावली. (All Photos : Social Media/ Instgram)

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ इंदोरीकर ऊर्फ इंदोरीकर महाराज यांच्या लाडक्या लेकीचं , रविवार 3 मे रोजी थाटामाटात लग्न झालं. अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी येथे झालेल्या सोहळ्यात ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप हे विवाहबद्ध झाले. हजारो लोकांनी या सोहळ्यास हजेरी लावली. (All Photos : Social Media/ Instgram)

2 / 6

इंदोरीकर महाराजांच्या निमंत्रणाला मान देऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील अनेक नेते, नामवंत मंडळींनी विवाहसोहळ्यास आवर्जून हजेरी लावत वधुवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

3 / 6

थाटामाटात पार पडलेल्या या विवाहाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. लग्नानंतर साहिल आणि ज्ञानेश्वरी यांनी देवदर्शन घेत आशीर्वाद घेतला. त्याचेही फोटो, व्हिडीओ आता समोर आलेत.

4 / 6

लग्नसोहळ्यानंतर नवपरिणीत जोडपं हे जेजुरीला गेलं होतं. तिथे त्यांनी भंडाऱ्याची उधळण केली. पिवळसर हिरवी, सुंदर साडी नेसलेली ज्ञानेश्वरी आणि पांढरा कुर्ता, डोक्यावर टोपी अशा वेशेभूषेतील साहिल यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

5 / 6

साहिल हे नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनिषा सुनील चिलप यांचे पुत्र आहेत. सुनील चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आहे. पनवेलच्या खांदा कॉलनीत त्यांचं अलिशान घर आहे. साहिल यांनी इंजीनिअरिंगचं शिक्षण गेल्यावर्षीच पूर्ण केलं आहे.

6 / 6

तर इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिने एमसी डीसीएसचं शिक्षण पूर्ण केलंय. गेल्यावर्षी दोघेही शिक्षण घेत असतानाच कुटुंबाने लग्नाचा निर्णय घेतला. साहिल आणि ज्ञानेश्वरी दोघेही आईवडिलांच्या शब्दाच्या बाहेर नसल्याने त्यांनीही या लग्नाला संमती दर्शवली. दोघांनीही साखरपुड्यासाठी होकार दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us