AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay : नोकरी आणि व्यावसायात येत असतील अडथळे तर बुधवारी अवश्य करा हे उपाय

बुधाची स्थिती योग्य नसल्यास व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Budhwar Upay : नोकरी आणि व्यावसायात येत असतील अडथळे तर बुधवारी अवश्य करा हे उपाय
गणपतीImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 25, 2023 | 3:56 PM
Share

मुंबई : लाल किताबानुसार बुधवार (Budhwar Upay) हा प्रथम पूजनीय भगवान गणेश आणि माता दुर्गा यांना समर्पित आहे.  ज्यांच्या पत्रिकेत बुधाची स्थिती कमजोर असेल त्यांनी बुधवारी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. बुधाची स्थिती योग्य नसल्यास व्यक्तीला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रामध्ये बुधवारी करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सर्व अडथळे दूर होतात आणि कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. चला तर जाणून घेऊया करिअर आणि बिझनेसमध्ये फायद्याचे हे बुधवारचे उपाय.

माता दुर्गेची करा आराधना

ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी माता दुर्गेचे ध्यान करताना दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. असे केल्याने जीवनात कोणतेही अडथळे येत नाही आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. बुधवारी दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने त्या पाठाचे पुण्य एक लाख पठणाच्या बरोबरीचे असते, असे सांगितले जाते.

बुधवारी या वस्तूचे दान करा

जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे किंवा कर्जाने त्रस्त असाल तर दर बुधवारी ऋणी गणेश स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने श्रीगणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. हा पाठ केल्याने जीवनात हळूहळू सुख-समृद्धी येते आणि अडथळेही दूर होतात. ध्यानात ठेवा की ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण केल्यानंतर श्रीगणेशाची आरती करावी.

ही वस्तू गणेशाला अर्पण करा

दर बुधवारी श्रीगणेशाला शमीची पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात. शमीची पाने उपलब्ध नसल्यास दूर्वा अर्पण करता येते. दुर्वा अर्पण करण्यापूर्वी लक्षात ठेवा की 21 दुर्वांची जोडी बांधली जाते आणि अशा प्रकारे गणेशाच्या डोक्यावर 21 दुर्वा अर्पण केल्या जातात. दुर्वा अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि अनेक सांसारिक मनोकामना पूर्ण होतात.

ही गोष्ट गायीला खाऊ घाला

बुधवारी गायीला हिरवे गवत किंवा पालेभाज्या खायला द्याव्यात. असे केल्याने 33 कोटी देवी-देवतांचा आशीर्वाद आणि ग्रह दोषांचे दुःखही दूर होते. पण लक्षात ठेवा की तुम्ही कमीत कमी तीन महिने गाईला गवत आणि हिरवे पालक खायला द्यावे, त्यानंतर तुम्हाला फळे मिळू लागतील. या गोष्टी गायीला खाऊ घातल्याने आयुष्यातील सर्व संकटे हळूहळू दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.