Shukrawar Upay: वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आणि धनलाभासाठी शुक्रवारी करा ‘हे’ उपाय

वैवाहिक जीवनात अडचण येत असल्यास किंवा आर्थिक समस्या असल्यास शुक्रवारच्या दिवशी केलेल्या या उपायांनी लाभ होतो.

Shukrawar Upay: वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आणि धनलाभासाठी शुक्रवारी करा हे उपाय
शुक्रवार उपाय
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 08, 2022 | 8:19 PM

मुंबई,  हिंदू दिनदर्शिकेनुसार शुक्रवार (Shukrawar Upay) हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. एखाद्याच्या आयुष्यात वारंवार आर्थिक समस्या येत असेल तर दर  शुक्रवारी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. माता लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी म्हटले जाते.  लक्ष्मी प्रसन्न असल्यास घरामध्ये संपत्तीशी संबंधित कोणतीही समस्या कधीच येत नाही. जर तुम्हालाही आर्थिक संकट किंवा वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर शुक्रवारी काही खास उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल.

शुक्रवारी करा हे उपाय

  1. वैवाहिक जीवनात तणाव , मतभेद आणि कलह होत असेल तर शुक्रवारी एक मातीचा दिवा घेऊन त्यात  कापूर टाकून तो पेटवा. यानंतर ती कापराची आरती संपूर्ण घराभोवती फिरवावी. यामुळे वैवाहिक कलह दूर होतो.
  2. वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि गोडवा टिकवून ठेवण्यासाठी शुक्र ग्रह बलवान असणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी ग्राम ग्रिम वरा सह शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने पती-पत्नीचे नाते घट्ट होते.
  3. वैवाहिक जीवनात सुख-शांती हवी असेल तर शुक्रवारी देवी महालक्ष्मीची पूजा करा.  महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला सौभाग्य वाण अर्पण करा. त्यात लाल रंगाचे कपडे, लाल चोळी, कुंकू आणि लाल बांगड्यांचा समावेश असावा.
  4. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर शुक्रवारी लाल कपडा घ्या आणि त्यात मूठभर तांदूळ ठेवा.  ‘ओम श्रीं श्रीये नम:’ मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर गाठोडी केलेले तांदूळ  तिजोरीत ठेवा, असे केल्याने आर्थिक अडचण दूर होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)