Video : किंग कोब्राशी भररस्त्यात भिडलं मुंगूस, थरारक लढाई पाहून लोकांच्या तोंडचं पळालं पाणी
किंग कोब्रा आणि मुंगूसाची भीषण लढाईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावर झालेल्या या लढाईत मुंगूसाने कोब्राला परास्त केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
साप आणि मुंगूस म्हणजे जन्मोजन्मीचे शत्रू, जणू विळ्या-भोपळ्याचं त्यांचं नातं. जेव्हाही हे दोघे समोर येतात तेव्हा एकमेकांशी जोरदार भिडतात. त्यातच तो साप म्हणजे सगळ्यात डेंजर असा किंग कोब्रा असेल तर विषयच संपला ना… उत्तर प्रदेशातील औरैया येथून असाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक किंग कोब्रा आणि एक मुंगूस दोघंही रस्त्यावर जोरदार भिडले. हा व्हिडिओ औरैया सदर कोतवाली परिसरातील बर्मुपूर कालव्याच्या ट्रॅक रोडचा असल्याचे सांगितले जात आहे. किंग कोब्रा आणि मुंगूसाच्या लढाईचा थरारक व्हिडीओ व्हायरलही झाला.
दिवसा ढवळ्या जेव्हा रस्त्यावरून वाहतूक, वर्दळ सुरू होती, तेव्हा अनाचनक लोकांना जे दृश्य दिसलं ते पाहून गाड्यांचे ब्रेक करकचून लागले. सगळ्यांनी पटापट गाड्या थांबवल्या आणि श्वास रोखून ते कोब्रा आणि मुंगूसाची लढाई पाहू लागले. काही लोकांनी चूपचाप मोबाईल हातात घेऊन या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डिंगल करण्यास सुरुवात केली. हळूहळू हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेचा विषय बनला. काळ्या रंगाचा हाँ कोब्रा त्यांची संपूर्ण ताकद लावून फणा काढून उभा होता, तर मुंगूसही त्याला न घाबरता उभा होता, मागे हटण्याचं नावही घेत नव्हता.
किंग कोब्रा- मुंगूसाची लढाई
त्या दोघांची लढाई काही वेळ सुरू होती. अचानक मुंगूसाने योग्य क्षण साधत कोब्रावर अचानक झडप घातली आणि डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तेवढ्यात त्याने कोब्राला दातांत घट्ट पकडून झूडुपांत गायब झाला. अवघ्या काही क्षणांमध्ये ही संपूर्ण घटना घडली. झाडीतून बाहेर आलेल्या मुंगूसाने झडप घालत कोब्राला पकडलं आणि घेऊन गेला. पण त्या दोघांची लढाई ही पाहणाऱ्यांसाठी खूपच थरारक होती, जणू एखादा फिल्मी सीनच. कोब्रा आणि मुंगूस हे एकमेकांचे कट्टर दुश्मन. दोघांची स्फूर्ती, ताकद आणि लढाई अशी फार कमी वेळाच पहायला मिळते.
तज्ज्ञांच्या मते, मुंगूसामध्ये विषारी सापांशी लढण्याची आणि त्यांना मारण्याची शक्ती आहे. आता औरैयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. .तिथेही असेच काहीसे दिसून आले. जिथे मुंगूसाने संधी पाहून किंग कोब्रावर झडप घातली आणि सापाला एका बाजूला नेले. ज्यांनी मुंगूस आणि साप यांच्यातील सामना पाहिला त्यांना तर लढाई आयुष्यभर लक्षात राहील.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

