फ्लाइटमधला रोमान्स केवढ्याला पडतो? काय होतं? माजी एयर होस्टेसने सांगितलं मोठं सत्य

फ्लाइटमध्ये रोमान्स आणि शारीरिक संबंध ठेवल्यास काय होतं, फ्लाइटमधला रोमान्स केवढ्याला पडतो? काय होतं? कोणते आणि कसे आहेत नियन, माजी एयर होस्टेसने सांगितलं मोठं सत्य

फ्लाइटमधला रोमान्स केवढ्याला पडतो? काय होतं? माजी एयर होस्टेसने सांगितलं मोठं सत्य
| Updated on: Jul 17, 2025 | 3:04 PM

विमानाचं आकर्षन प्रत्येकाला असतं. पहिल्यांदा विमानात बसणाऱ्यांचा आनंद तर गगनात मावेनासा असतो. पण मनात एक भीती देखील असते. कारण होत असलेले विमान अपघात. विमानातून प्रवास करण्यासाठी तर अनेक जण उत्सुक असतात. पण विमानातील काही देखील नियम आहेत. ज्याचं उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात रोमान्स करण्याचा प्रयत्न करणं… प्रवाशांची धोकादायक असू शकतं.

अशात जर प्रवाशांना रोमान्स करताना पडकड्यात आलं तर काय होऊ शकतं? याबद्दल माजी एयर होस्टेसने सांगितलं आहे. रिपोर्टनुसार, माजी एयर होस्टेस मँडी स्मिथ हिने विमानासंदर्भातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विमानात रोमान्स करताना आणि शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रयत्न केल्यास काय होऊ शकतं याबद्दल माजी एयर होस्टेस मँडी स्मिथ मोठा खुलासा केला आहे.

माजी एयर होस्टेस मँडी स्मिथ यांच्यानुसार, 30 हजार उंचीवर जवळीक साधण्याची कल्पना पॉप संस्कृतीत फार पूर्वीपासून पसरवली जात आहे. आतापर्यंत ती खूप ग्लॅमराइज्ड झाली आहे. जर कोणी विमानात रोमान्स करण्याचा प्रयत्न केला तर काय होते याबद्दल हा एक सामान्य समज आहे.
रिपोर्टनुसार, जेव्हा प्रवासी बाथरुमचा उपयोग करतात तेव्हा एयर होस्टेस प्रवाशांच्या हलचालींवर लक्ष ठेऊन असतात. जर एखादा प्रवासी शौचालयात जास्त वेळ घालवत असेल किंवा काही संशयास्पद हालचाल करताना आढळला तर, फ्लाइट अटेंडंट दरवाजा आतून बंद असला तरीही तो उघडू शकतो.

मँडी म्हणाल्या, जर रोमान्स किंवा शारीरिक संबंध ठेवताना करताना पकडले गेले तर दंड किंवा कठोर शिक्षेची तरतूद असू शकते. विमान ज्या ठिकाणाहून निघालं आहे त्या ठिकाणाच्या आणि गंतव्यस्थानाच्या कायद्यावर अवलंबून असू शकतं.

विमानात रोमान्स किंवा शारीरिक संबंध ठेवणं एक अपराध आहे. पण जेव्हा सर्वांसमोर त्यांचं कृत्य समोर आलं तर, त्यांना शिक्षा होऊ शकते. जर कोणी आपल्या सीटवर अन्या लोकांच्या समोर असं करत असेल तर, कारवाई होऊ शकते. विमानातून प्रवास करण्याचे असे अनेक नियम आहेत.