अवघ्या ९ वर्षाच्या चिमुकलीची कमाल, शौर्या सरोदे देतेय लाठी-काठी प्रशिक्षण
VIDEO | मोबाईल गेम नको, हवे साहसी खेळ; संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावातील शौर्या सरोदे स्वत: पारंगत झाल्यानंतर 9 वर्षाची चिमुकली देतेय गावातील मुला-मुलींना लाठी-काठी अन् साहसी खेळाच्या स्वरक्षणाचे धडे
अहमदनगर, २६ ऑगस्ट २०२३ | अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावातील शौर्या सरोदे ही चिमुकली आपल्या गावातील मुला – मुलींना लाठी काठी तसेच साहसी खेळाचे प्रशिक्षण देतेय. स्वत : खेळात पारंगत झाल्यानंतर शौर्या आता शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतेय. शहरी भागात पैसे खर्च करून मुले कराटे, लाठी – काठी तसेच साहसी खेळाचे शिक्षण घेतात. मात्र ग्रामीण भागात तसं प्रशिक्षण मिळत नाही. आपल्या शिक्षणाचा फायदा इतरांना देखील व्हावा असा शौर्याचा यामागील मानस आहे. आंबी दुमाला येथील इयत्ता चौथीमध्ये शिकणारी नऊ वर्षाची शौर्या आता लाठी – काठी आणि साहसी खेळाची प्रशिक्षक बनलीय. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ती दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर जाते तेथे तिने साहसी खेळ करताना काही तरूण – तरूणींना बघितलं आणि वडीलांकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र गावात तशी व्यवस्था नसल्याने मोबाईलवर विविध व्हिडीओचा अभ्यास करून वडीलांनी तिला या खेळांमध्ये पारंगत केले. आत्तापर्यंत 400 हून अधिक मुलांना तिने प्रशिक्षण दिल्याच तिचे वडील म्हणतायत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

