Bilawal Bhutto : भारताला पोकळ धमक्या देणाऱ्या पाक लष्कर प्रमुखानंतर बिलवाल भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम…

Bilawal Bhutto : भारताला पोकळ धमक्या देणाऱ्या पाक लष्कर प्रमुखानंतर बिलवाल भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम…

| Updated on: Apr 28, 2025 | 12:37 PM

बिलवाल भुट्टो म्हणाले की, सिंधू नदीजवळ उभे राहून मला स्पष्टपणे सांगायचे आहे की, सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील. भारताला अशी धमकी देणाऱ्या नेत्याच्या कुटुंबानेच सोडला पाकिस्तान देश....

रक्ताचे पाट वाहतील असं म्हणणाऱ्या बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबाने पाकिस्तान सोडल्याची माहिती समोर येत आहे. बिलावल भुट्टो याचं कुटुंब पाकिस्तानातून परदेशात पळालंय. पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मनीर याचं कुटुंबही पाकिस्तान सोडून परदेशात पळून गेलं होतं. लष्कराचे प्रमुख असीम मुनीर याच्या परिवाराने देश सोडत कॅनडात आहेत. सध्या पाकिस्तानात भितीचं वातावरण असून लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टो यांचं कुटुंबीय देश सोडून पळाले आहेत. जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवायानंतर पाकिस्तानमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने कठोर पाऊलं उचलली आणि सिंधू जल करार रद्द केला होता. यानंतर पाकिस्तानकडून चांगलाच थयथयाट करण्यात आला. ‘भारत देशाची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोकं आहोत. त्यामुळे एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त’, असं विधान बिलवाल भुट्टो यांनी करत भारताला धमकी दिली आहे.

Published on: Apr 28, 2025 12:37 PM