रक्षण करणाऱ्या पोलिंसावर दगडफेक करणे योग्य नाही; कारवाई तर होणारच : संदिपान भुमरे

| Updated on: Mar 30, 2023 | 11:41 AM

यावेळी भुमरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याचबरोबर यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला सुचना केल्या आहेत.

Follow us on

छत्रपती संभाजीनगर : येथील किऱ्हाडपुरा भागातील राम मंदिरासमोर रात्री बारा साडे बाराच्या सुमारास मुलांच्या दोन गटात वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. याचा फायदा काही समाजकंटकांनी उचलत पोलिसांची वाहन पेटवून दिली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी भेट देत सर्व माहिती घेतली. तसेच जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिल्याचे सांगितलं. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, औरंगबादचा तणाव निवळला आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. आता काळजी करण्याचे कारण नाही. पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. माझी सगळ्यांना सूचना आहे की कोणी तणाव निर्माण करू नये. शांतता ठेवावी असे आवाहन छत्रपती संभाजीनगर वासियांना केलं आहे.

यावेळी भुमरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्याचबरोबर यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला सुचना केल्या आहेत. त्यांनी रात्री घटना योग्य रित्या हाताळली. मात्र जे पोलीस आपले रक्षण करतात त्यांच्यावर दगडफेक करणं योग्य नाही असेही ते म्हणाले. त्याचबरोबर सध्या पवित्र रमजान सुरू आहे. आझ रामनवमी आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाने शांतता बाळगा असेही आवाहन भुमरे यांनी केलं आहे.