Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
मकोका कायद्याअंतर्गत आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे बीडच्या तुरूंगात आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात शिक्षा भोगत आहे. अशातच यांच्यात राडा झाल्याची माहिती मिळतेय.
बीड तुरूंगात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन घुले हे सध्या बीडच्या तुरूंगात आहेत. अशातच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपी मकोका अंतर्गत त्याच तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. ज्या ठिकाणी कराड आणि घुले आहेत त्याच्या बाजूच्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी आहे. त्यालाही मकोका कायद्याअंतर्गत तुरूंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह परळीतील महादेव गीते हा देखील एक आरोपी असून हे दोघेही वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती मिळत आहे. तुरूंगात या सर्व आरोपींमध्ये सुरूवातीला बाचाबाची झाली आणि त्यानंतर बाचाबाचीचं रूपांतर मारहाणीत झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत किंवा मारहाणीबाबत जेल प्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

