Taxpayers : करदात्यांसाठी खूशखबरी! प्राप्तिकरात 5 लाखापर्यंत मिळू शकते सूट?

Taxpayers : करदात्यांसाठी या अर्थसंकल्पात दुप्पट कर सवलत मिळू शकते..

Taxpayers : करदात्यांसाठी खूशखबरी! प्राप्तिकरात 5 लाखापर्यंत मिळू शकते सूट?
करदात्यांना दिलासाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 11:36 PM

नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्प 2023-24 (Budget 2023-24) साठीची तयारी जोरात सुरु आहे. त्यासाठी अवघे दोन महिने उरले आहेत. अर्थसंकल्प आला की सर्वात पहिले मागणी होते ती, कर सवलतीची (Tax Exemption) मर्यादा वाढविण्याची. कर सवलत मर्यादा दुप्पट करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी दुप्पट कर सवलत मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारवर कर्मचाऱ्यांचाच नाही तर औद्योगिक संघटनांचाही दबाव आहे. त्यामुळे आयकर (Income Tax) सवलत वाढण्याची शक्यता आहे.

इंडस्ट्री बॉडी एसोचॅमने (ASSOCHAM) कर सवलतीची वकिली केली आहे. येत्या अर्थसंकल्पात कर सवलत देण्याची मागणी संघटनेने केली आहे. सध्याची 2.5 लाख रुपयांची कर सवलत 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची विनंती संघटनेने केली आहे. भारतातील कर्मचारी संघटना आणि करदात्यांनी हीच मागणी केली आहे.

सध्या करदात्यांना 2.5 लाख रुपयांची कर सवलत मिळते. या रक्कमेवर कर लागत नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. तर सर्वात ज्येष्ठ नागरिकांना, 80 वर्षांवरील नागरिकांना सध्या 5 लाख रुपयांची सूट मिळते.

हे सुद्धा वाचा

एसोचॅमचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांनी माहिती दिली. त्यानुसार, स्टील आणि सिमेंटच्या क्षेत्रात येत्या काही दिवसात तेजी येईल. या क्षेत्रातील कंपन्या त्यांच्याच क्षमतेत वाढ करण्याची योजना आखत आहेत. सध्या जागतिक बाजारात मंदीची आशंका आहे. त्यामुळे व्यापार प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जीडीपीवर होऊ शकतो.

एसोचॅमने अर्थसंकल्पापूर्वी त्यांच्या शिफारशी केल्या आहेत. त्यात आयकर सवलत वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही सवलत 5 लाख रुपयांपर्यंत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हाती मोठी रक्कम उरावी यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढणार आहे.

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.