
Home Loan Type : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण रोख घर घेणे प्रत्येकासाठी शक्य नसते. त्यामुळे सर्वसामान्य लोकं गृहकर्ज घेतात. सध्या बँकांसोबतच वित्तीय संस्थाही देखील गृहकर्ज देतात. तुम्ही पण जर होमलोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की तुम्ही किती प्रकारचे कर्ज घेऊ शकता?
बँक ग्राहकांना प्रामुख्याने दोन प्रकारचे कर्ज देते. बँका दोन प्रकारचे कर्ज देते. जर तुम्ही तुमचे घर बांधत असाल तर तुम्ही गृहनिर्माण कर्ज देखील घेऊ शकता. याशिवाय बँक तुम्हाला गृह विस्तार कर्ज देखील देते. सध्याचे घर मोठे करण्यासाठी हे कर्ज घेतले जाते.
जर तुम्हाला एक मजली घर तीन मजली करायचे असेल तर तुम्हाला हे कर्ज मिळू शकते. जर तुम्ही प्लॉट खरेदी केला असेल तर त्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. या प्रकारच्या कर्जाला जमीन खरेदी कर्ज म्हणतात.
जर तुमचे घर जुने झाले असेल तर तुम्हाला ते घर दुरुस्त करण्यासाठी गृह सुधार कर्ज घेऊ शकता. जेव्हा बँका आपल्याला अनेक प्रकारची कर्जे देतात, तेव्हा आपण गोंधळून जातो की आपल्यासाठी कोणते कर्ज सर्वोत्तम आहे?
तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर तुमच्या गरजेनुसार कर्ज घ्या. यासोबतच बँक तुम्हाला कर्जावर किती व्याजदर देत आहे, हे देखील ध्यानात घ्या. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे असतात. अशा स्थितीत संपूर्ण चौकशी करुनच तुम्ही कर्ज घेतले पाहिजे.
बँकेच्या शाखेत जाऊन देखील कर्जाबद्दल जाणून घेऊ शकता. जेव्हा आपण कर्ज घेत असतो तेव्हा आपल्या मनात भविष्याचे प्रश्नही निर्माण होतात. सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की एखादी व्यक्ती किती गृहकर्ज घेऊ शकते?
Home Loan : होमलोन संपल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे मागायला विसरु नका
प्रत्येक व्यक्ती एका वेळी एकच गृहकर्ज घेऊ शकते. काहीवेळा परिस्थिती अशी असते की तुम्ही दुप्पट कर्ज घेऊ शकता. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तेव्हाच बँक तुम्हाला दोन कर्ज देते. यासोबतच तुमचा उत्पन्नाचा स्रोतही मजबूत होतो, तरच बँक दुसरे कर्ज देते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसह संयुक्त गृहकर्जही घेऊ शकता.