अबॉर्शन करण्यासाठी सर्वांनी…, लग्नाआधी गरोदर राहिलेल्या अभिनेत्रीचं दिग्गज क्रिकेटरसोबत अफेअर, पण…

Actress Love Life: लग्नाआधी गरोदर राहिलेल्या अभिनेत्रीचं दिग्गज क्रिकेटरसोबत अफेअर, तिला सर्वांनी दिला अबॉर्शनचा सल्ला, क्रिकेटरने मात्र..., अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

अबॉर्शन करण्यासाठी सर्वांनी..., लग्नाआधी गरोदर राहिलेल्या अभिनेत्रीचं दिग्गज क्रिकेटरसोबत अफेअर, पण...
फाईल फोटो
| Updated on: May 04, 2025 | 3:33 PM

Actress Love Life: 1989 मध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांना त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल कळलं. लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे नीना यांना कल्पना होती की पुढचा प्रवास सोपा नाही. पण नवी पाहुणा आयुष्यात येणार म्हणून त्या आनंदी होत्या. त्या काळात एकट्या महिलेने मुलाला जन्म देणं आणि सांभाळणं फार कठीण होतं. नीना गुप्ता यांच्या होणाऱ्या बाळाचे वडील वेस्टइंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिटर्ड्स होते. विवियन आणि नीना यांचं लग्न झालेलं नव्हतं. गरोदर राहिल्याचं लक्षात येताच अभिनेत्री आनंदी झाली. पण अंतिम निर्णयासाठी अभिनेत्रीने विवियन यांना विचारलं.

नीना गुप्ता यांच्या पुस्तकात लिहिल्यानुसार, दोघांची भेट एका डिनर दरम्यान झाली. त्यानंतर दोघांची भेट दिल्ला विमानतळावर झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. अखेर घरी परतल्यानंतर नीना यांना प्रेग्नेंसीबद्दल कळलं.

पुस्तकात नीना म्हणतात, ‘विवियनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना मी प्रेग्नेंट राहिले. पण जेव्हा मला प्रेग्नेंसीबद्दल कळलं तेव्हा विवियन त्यांच्या घरी पोहोचले होते. अनेकांनी मला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला. सिंगल पॅरेंट असण्याचे वाईट परिणाम देखील लोकांनी मला सांगितलं. अखेर मी स्वतःला विचारलं की मला काय हवं आहे. मला कसं वाटत आहे? उत्तर होतं, मी आनंदी आहे…’

‘मला हे देखील जाणवलं की मी एकटीच याबद्दल विचार करत नव्हते.’ बाळाचे वडील विवियन देखील काळजीत होते. म्हणून मी एके दिवशी त्यांना फोन केला आणि बराच वेळ त्यांच्याशी बोलले. मी त्यांना विचारलं, तुमच्या बाळाला जन्म दिला तर, तुम्हाला काही अडचण आहे का? तेव्हा विवियन म्हणाले, ‘हे बाळ जेवढं तुला प्रिय आहे तेवढंच मला देखील प्रिय आहे… विवियन यांनी माझ्या निर्णयाचं समर्थन केल्यानंतर मला देखील दिलासा मिळाला.’ नीना गुप्ता यांनी लेक मसाबा गुप्ता हिला जन्म दिला.

मसाबाच्या जन्मानंतर विवियन दोघींना भेटण्यासाठी देखील यायचे. विवियन दुसऱ्या देशात राहायचे आणि विवाहित असल्यामुळे नीना गुप्ता यांच्यासोबत असलेलं त्यांचं नातं फार कठीण होतं. नात्यावर नीना म्हणाल्या, ‘आमचं नातं फार काळ टिकलं नाही. आमच्या चांगल्या – वाईट आठवणी आहेत.’ असं देखील नीना म्हणाल्या.