AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाकाची सर्जरी, लिप फिलर्सबद्दल श्रीदेवी यांच्या मुलीची कबुली; म्हणाली “त्यात काहीच गैर नाही..”

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी खुशी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्लास्टिक सर्जरी, बोटॉक्स, लिप फिलर्स, आयब्रो नॅनो-ब्लेड यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. हे सर्व करण्यात काहीच गैर नसल्याचं मत तिने मांडलं आहे.

नाकाची सर्जरी, लिप फिलर्सबद्दल श्रीदेवी यांच्या मुलीची कबुली; म्हणाली त्यात काहीच गैर नाही..
Khushi KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 28, 2025 | 10:52 AM
Share

कलाविश्वात काम करणाऱ्यांसाठी सुंदर दिसणं किती महत्त्वाचं असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे. याच सुंदरतेसाठी आजवर अनेक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला आहे. अगदी प्रियांका चोप्रापासून ते आता जान्हवी आणि खुशी कपूरपर्यंत अनेकींनी कॉस्मेटिक सर्जरी करून आपला चेहरामोहरा बदलला आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची छोटी मुलगी खुशी कपूरने गेल्या वर्षी एका मुलाखतीत नाकाची सर्जरी केल्याची कबुली दिली होती. मात्र यामुळे तिला सोशल मीडियावर बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेटकऱ्यांनी तिला ‘प्लास्टिक’ म्हणून हिणवलं होतं. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुशी पुन्हा एकदा कॉस्मेटिक सर्जरी, लिप फिलर्स, बोटॉक्स यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. हे सर्व करण्यात गैर काहीच नाही किंवा ही काही फार मोठी बाब नाही, असं मत तिने मांडलंय.

भुवयांवर नॅनो-ब्लेडची प्रक्रिया

‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत खुशी म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच मी आयब्रोजवर (भुवया) नॅनो-ब्लेडची प्रक्रिया केली. माझ्या भुवयांचे केस आधीपासूनच दाट आहेत, परंतु त्यात मधे मधे थोडं अंतर जाणवत होतं. म्हणून मी नॅनो-ब्लेड ट्रिटमेंटद्वारे त्यांना अधिक चांगलं केलं. हे केल्यानंतर तुम्ही पुढचे दहा दिवस भुवयांना पाणी लावू शकत नाही. ते तुम्हाला एक प्रकारचं शिल्ड देतात, जे कपाळावर लावल्यास अंघोळ करताना भुवयांवर पाणी पडत नाही. दिसायला ते खूपच हास्यास्पद दिसतं. तो शिल्ड चेहऱ्याला लावल्यानंतर मी माझ्या मित्रमैत्रिणींना माझा क्लोज अप फोटो पाठवला. त्यावर मी काही लिहिलंसुद्धा नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी मला सवाल केला नाही. कारण आता हे सर्व नॉर्मल झालं आहे.”

प्लास्टिक सर्जरीबद्दल काय म्हणाली?

या मुलाखतीत खुशीला तिच्या कॉस्मेटिक सर्जरीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ती पुढे म्हणाली, “मला ही फार काही मोठी गोष्ट वाटत नाही. मुख्य समस्या अशी आहे की आपण त्याबद्दल खरं सांगितलं तर लोक ट्रोल करतील, द्वेष करतील अशी भीती अनेकांना वाटते. माझ्या मते लोक तुम्हालाही असेही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल करतात. तुम्ही समोरच्या व्यक्तीला ‘प्लास्टिक’ म्हटलं की त्याचा खूप मोठा अपमान केला असं लोकांना वाटतं. पण मला प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी करण्यात काहीच वाईट किंवा चुकीचं वाटत नाही.”

“कलाकारांनी चाहत्यांसोबत खोटं बोलू नये”

“काहीजण कॉस्मेटिक सर्जरी करतात आणि म्हणतात की पहा मी नैसर्गिकरित्या किती सुंदर दिसते, तर हे चुकीचं आहे. कारण मग तुम्ही लोकांसमोर सौंदर्याची अवास्तव मानकं सादर करत आहात. तरुण मुलींना त्यांच्याकडे पाहून प्रश्न पडतो की, अरे मी अशी का दिसत नाही? कारण त्यांनी त्यासाठी बरंच काही केलेलं असतं. त्यांच्याकडे टीम असते, सतत फेशिअल्स केले जातात, मेकअप असतं. तुम्ही स्किनकेअरच्या काही गोष्टी ट्राय करू शकता आणि अनेकांना त्याबद्दल माहीत नसतं”, असंही खुशीने सांगितलं.

कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांसोबत प्रामाणिक असायला हवं, असंही मत खुशीने मांडलंय. याविषयी ती म्हणाली, “तुम्ही तुमच्या चाहत्यांसोबत प्रामाणिक असायला हवं. कारण असंही काही लोकं तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने पसंत करणार नाहीत. मला असं बोललेलं अजिबात आवडणार नाही की, तिने आता सर्वांसमोर सत्य सांगितलं. म्हणूनच मी कुठल्याही एका कमेंटवर उत्तर देत म्हणाले की, माझ्यासाठी ही (प्लास्टिक सर्जरी) फार मोठी गोष्ट नाही.”

माझ्या दिसण्याबाबत खोटं बोलून मला अफवांना आणखी हवा द्यायची नाही, असं खुशीने स्पष्ट केलं. “सुरुवातीला मीसुद्धा घाबरायचे. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत, त्यासाठी ते आधीच मला ‘प्लास्टिक’ म्हणत आहेत, मग एखाद-दुसऱ्या केल्या आणि त्यांची जाहीरपणे कबुली दिली तर ते माझा आणखी तिरस्कार करणार का, असा प्रश्न मला पडायचा. पण हा विचार केल्यानंतर मला ती गोष्ट फार मोठी नसल्याचं जाणवलं. मी अजूनही तीच व्यक्त आहे. खरंच काही फरक पडत नाही”, असं खुशीने सांगितलं.

खुशी कपूरने ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती लवकरच अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लवयापा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत भूमिका साकारत असून हा चित्रपट येत्या 7 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.