Sunjay Kapur Death : संजय कपूरची पहिली पत्नी कोण ? रणबीरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन
Sunjay Kapoor First Wife Nandita Mahtani : अभिनेत्री करिश्मा कपूरशी लग्न करण्यापूर्वी संजय कपूरचं एक लग्न झालं होतं, नंदिता महतानीशी तो विवाहबद्ध झाला होता. कोण आहे नंदिता ? जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पूर्वाश्रमीचा पती आणि बिझनेसमन संजय कपूर याचं काल लंडनमध्ये अकस्मात निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. नामवंत उद्योगपती असलेल्या संजय कपूर याच्या निधनानंतर केवळ व्यावसायिक जगातच नाही तर बॉलिवूड आणि फॅशन इंडस्ट्रीमध्येही शोककळा पसरली आहे. संजय कपूर यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल पण अभिनेत्री करिश्मा कपूर आणि त्यानंतर प्रिया सचदेव हिच्याशी लग्नगाठ बांधण्यापूर्वी संजय कपूर याचं लग्न फॅशन डिझायनर आणि सोशलाइट नंदिता महताना हिच्याशी झालं होतं.नंदिता महतानी केवळ एका व्यावसायिक कुटुंबातील यक्तीच नव्हे तर बॉलिवूड आणि क्रिकेटशीही तिचे संबंध आहेत.
90 च्या दशकात झालं लग्न
नंदिता आणि संजय कपूर यांचे लग्न 1996 साली झालं. मात्र त्यांचं नातं आणि लग्न फार काळ टिकलं नाही आणि अवघ्या चार वर्षांतच,म्हणजे 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. नंदिता महतानी ही दिल्लीतील एका प्रभावशाली व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचा भाऊ भरत महतानी आणि बहीण अनु हिंदुजा हे देखील सोशल सर्कल मध्ये खूप सक्रिय आहेत. नंदिताच्या कुटुंबातील लग्नांमध्ये बॉलिवूडमधील मोठे स्टार उपस्थित राहिले होते, त्यावरून तिचे नेटवर्क किती मोठे आहे याची कल्पना येते.
बॉलिवूडशी खास नातं
एवढंच नव्हे तर वेळोवेळी नंदिता महतानीचे नाव अनेक मोठ्या स्टार्सशी जोडले गेले. तिने केवळ डिनो मोरियाला डेट केले नाही तर त्याच्यासोबत ‘प्लेग्राउंड’ नावाचा फॅशन ब्रँडही चालवला. एवढंच नव्हे तर एक काळ असा होता जेव्हा तिचे नाव अभिनेता रणबीर कपूरशी जोडलं गेलं होतं. आपण नंदितामुळे खूप प्रभावित होतो होता आणि एकेकाळी तिला डेटही केलं होतं, असं रणबीरने स्वतः एका मुलाखतीत कबूल केलं. मला नंदितावर क्रश होता, हे माझ्या ईलाही माहीत होतं, असे रणबीरने 2017 साली ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत नमूद केलं.
रणबीरनंतर नंदिताचं नाव बॉलिवूडमधील आणखी एका नेत्याशी जोडलं गेलं होतं. 2017 साली नंदिताने अभिनेता विद्युत जामवालशी साखरपुडा केला. दोघांनीही सोशल मीडियावर त्यांचं नातं जाहीरही होतं. आणि ताजमहाल येथील फिल्मी प्रपोजलचे फोटोही शेअर केले. मात्र, हे नातं लग्नाच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि काही काळाने दोघेही वेगळे झाले.
विराट कोहलीशीही कनेक्शन
नंदिता महतानी ही फक्त बॉलिवूडपुरती मर्यादित नाही तर ती भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात नामवंत, प्रसिद्ध खेळाडू असलेल्या विराट कोहलीची स्टायलिस्ट देखील आहे. 2012 पासून तिच्यावर विराटच्या लूक आणि स्टाईलची जबाबदारी आहे. विराटचा फॅशन सेन्स हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे – त्यातून साधेपणा, आत्मविश्वास आणि परिपक्व शैली झळकते, असा नंदिताचा विश्वास आहे.
संजय कपूरचं निधन
करिश्माचा पूर्वाश्रमीचा पती असलेला संजयचं काल यूकेमध्ये निधन झालं. पोलो सामन्यादरम्यान मधमाशी गिळल्याने संजय कपूर याला अस्वस्थ वाटू लागलं,हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयातही नेण्यात आलं, पण तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईक, मित्रांना मोठा धक्का बसला आहे. करिश्मा कपूरशी लग्न झाल्यानंतर संजय यांना समायरा आणि कियान ही दोन मुले झाली. 2016 साली ते दोघे वेगळे झाले आणि मुलांचा ताबा करिश्माकडे देण्यात आला. नंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं, त्यांना एक मुलगाही आहे.