
Sara Tendulkar With Bollywood Actor: क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सारा कधी तिच्या बॉलिवूडच्या मित्रांसोबत पार्टी करताना स्पॉट होते. तर कधी क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. पण काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. एवढंच नाही तर, दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं देखील केल्याच्या चर्चा रंगल्या. पण साराने कधीच कोणत्याच गोष्टीवर अधिकृत वक्तव्य केलं नाही. दरम्यान, साराच्या आयुष्यात नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याची देखील चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, साराचं ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं जात आहे, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आहे. रिपोर्टनुसार, सारा आणि सिद्धांत एकमेकांसोबत वेळ व्यतीत करत आहेत. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, सारा आणि सिद्धांत यांच्यामध्ये मैत्रीच्या पलिकडे नातं तयार होत आहे. पण दोघांनी देखील यावर मौन बाळगलं आहे.
सिद्धांत याआधी देखील त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी सिद्धांतच्या नावाची चर्चा महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्यासोबत झाली. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण अचानक दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं.
सिद्धांत याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत 5 सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्याच्या लोकप्रियतेत ‘गहराईया’ सिनेमानंतर वाढ झाली. सिनेमात सिद्धांत याने अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत लव्ह सीन दिले. आता सिद्धांत लवकरच Dil Ka Darwaaza Khol Na Darling सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नसली तरी सारा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एका मुलाखतीत, शुभमन याने सारासोबत असलेल्या मैत्रीची कबुली दिली होती. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांना ब्लॉक केल्याची माहिती समोर येत आहे.
सारा तेंडुलकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सारा कायम स्वतःचे फोटोशूट आणि व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते.. तर शुबमन गिल लोकप्रिय क्रिकेटर आहे. शुबमन कायम त्याच्या उत्तम खेळीमुळे चर्चेत असतो.