‘या’ सिनेमातून आमिर खानच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘या’ सिनेमातून आमिर खानच्या बहिणीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपचा ‘सांड की आंख’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचं शूटिंग जवळपास पूर्ण झालं आहे. हा सिनेमा दोन शार्प शूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या विषयी आहे. या सिनेमातून अभिनेता आमिर खानची बहीण निखत खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

पिंक विलाच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात तापसी आणि भूमीच्या शूटर दादीसोबतच इतरही भूमिकांना महत्त्व देण्यात आलं आहे. यापैकीच एक भूमिका निखत खान साकारणार आहे. जर असं झालं तर हा निखतची पहिला सिनेमा असेल. निखत बद्दल बऱ्याच जणांना कल्पना नव्हती. मात्र, सिनेमाच्या एका निर्मात्याने तिचं नाव सुचवलं आणि तिला सिनेमात घेण्याचं निश्चित झालं. या सिनेमात निखत महाराणीची भूमिका साकारणार आहे. सिनेमात तिचा कुठली गेस्ट अपिअरन्स किंवा कॅमिओ रोल नाही, तर ती संपूर्ण सिनेमात प्रमुख भूमिकेत असेल.

या सिनेमात अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांच्यासोबतच अभिनेता प्रकाश झा आणि विनीत सिंग यांची देखील मुख्य भूमिका असेल.

निखत खानचा थोडक्यात परिचय

निखत खान ही आमिर खानची बहीण आणि सिनेमा निर्माती आहे. ती 90 च्या दशकातील ‘तुम मेरे हो’ या सिनेमाची निर्माती होती. हा सिनेमा तिने तिच्या वडिलांसोबत बनवला होता. 2002 मध्ये आलेल्या ‘हम किसी से कम नहीं’ या सिनेमात तिने कॉस्ट्युम असिस्टंट म्हणून काम केले होते.

निखत ही निर्माता ताहिर खान आणि जीनत हुसैन यांची मुलगी आहे. आमिर खानसोबतच तिला आणखी एक भाऊ फैजल खान आणि बहीण फरहत खान आहे. तिच्या पतीचं नाव संतोष हेगडे आहे. निखतला दोन मुलं आहेत. मुलगा श्रवण आणि मुलगी सेहर अशी निखतच्या मुलांची नावं आहेत.

‘सांड की आंख’

हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमात तापसी आणि भूमी या वृद्ध ‘दादी’ची भूमिका साकारत आहेत. त्यासाठी त्यांचा लूकही जबरदस्त करण्यात आला आहे. यामध्ये भूमी आणि तापसीच्या लूकवर खूप काम करण्यात आलं आहे. या सिनेमाची निर्मिती निधी परमार आणि अनुराग कश्यप करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI