
फलटण येथील सरकारी रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर असलेल्या संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. महिला डॉक्टरने फक्त आत्महत्याच केली नाही तर आत्महत्येच्या अगोदर हातावर एक नोट लिहित धक्कादायक आरोप केली. पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे त्यांनी नोटमध्ये स्पष्टपणे म्हटले. यासोबतच ज्याठिकाणी महिला डॉक्टर फलटणमध्ये राहत होती, तिथे नाही तर तिने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने आपला शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचे तिने म्हटले. नुकताच पोलिस तपासात धक्कादायक बाब पुढे आली असून मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर हे संपर्कात होती आणि संपदा यांच्या आत्महत्येच्या काही वेळ अगोदरच दोघांमध्ये फोन झाला होता.
डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येनंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोपही करण्यात आला. गोपाळ बदने संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर फरार होता, शेवटी त्याने शरणागती पत्कारली असून तो पोलिस कोठडीत आहे. पोलिसांकडून कसून चाैकशी दोघांचीही केली जात आहे. ज्यावेळी आरोपी पीएसआय बदने फरार होता, त्यावेळी तो फलटण पोलिस ठाण्याच्या काही पोलिसांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या माध्यमातून होता.
आता नुकताच महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक अंशुमन धुमाळ आणि सातारा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर युवराज करपे यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला. महिला डॉक्टर संपदा मुंडे कधीही ताणतणावात असल्याचे जाणवले नाही, असे त्यांनी स्पष्ट म्हटले. आरोपी प्रशांत बनकर यांच्या बहिणीने दावा केला होता की, संपदा मुंडे मागील काही दिवसांपासून तणालात होत्या. मात्र, आता हे स्पष्ट झाले की, संपदा मुंडे तणावात नव्हत्या.
पुढे बोलताना अंशुमन धुमाळ आणि सातारा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर युवराज करपे यांनी म्हटले की, त्यांना (संपदा मुंडे) पोलिसांकडून त्रास दिला जातोय यांची तक्रार त्यांनी कधीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेली नाहीये. त्या कामात देखील चांगल्या होत्या, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शिफ्ट लावण्याचे काम देखील त्यांच्याकडेच होते. त्या अभ्यास करण्यासाठी 24 तास काम करून 24 तास ऑफ घ्यायच्या. विशेष म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांच्याबद्दल रुग्णालयात कधीही रुग्णांनी कोणतेही तक्रार केलेली नाही. डॉक्टर कामात देखील चांगल्या होत्या. त्यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयात 36 पोस्टमार्टम केल्याचा रेकॉर्ड आहे.