AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर आकाश पाताळ एक करू; अजितदादांच्या अपघातावर सभागृहात फडणवीस काय म्हणाले?

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर बोलताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

...तर आकाश पाताळ एक करू; अजितदादांच्या अपघातावर सभागृहात फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 6:26 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्यानं शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात कर्नाटकमध्ये एफआयर दाखल झाला यावर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे,  ‘मी तुम्हाला अश्वासीत करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल तर कोणाचा बापही असला तरी त्याला आम्ही सोडणार नाही. मुडदा असेल तर त्यालाही जमिनीतून खोदून काढू,  सहन नाही करणार. कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाहीये. अजितदादांच्या केसमध्ये, कोणी काही कट कारस्थान करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुडदाही खोदून काढू असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?   

रोहीत पवार राहूल गांधी यांना भेटले,  ⁠त्यांनी कर्नाटकमध्ये एफआयआर  करायला सांगीतला ⁠मात्र तसा झिरो एफआयर करता येत नाही.  तो चुकीचा आहे.  ⁠कर्नाटकने राजकीय दृष्ट्या तपास नीट सुरु नाही, यासाठी हा एफआयर दाखल केला आहे.  ⁠महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ⁠ तुमच्या मनात शंका ठेवू नका ⁠जर यात कोणी असेल तर आकाश पाताळ एक करु, मुडदा देखील खोदून काढू.  ⁠तुम्ही तरुण आहात तुमच्या भावना समजू शकतो, मात्र इतरांच्या भावना ही तेवढ्याच आहेत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सदर प्रकरण सिबीआयकडे पाठपुरावा सुरू आहे, रोहीत पवार यांनी भावनिक मुद्दा मांडला. याची चैकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे. रोहीत पवार यांना आमचा पाठिंबा आहे, मात्र इतर कोणाला घेणंदेणं नाही असा समज होऊ नये. राष्ट्रवादीचे आमदार तीन वेळा चौकशी संदर्भात मला भेटले, ⁠अमित शहा यांच्याकडे घेऊन जा अशी त्यांनी मागणी केली, अधिवेशन संपल्यानंतर त्यांना घेऊन जाऊ, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत