महिला डॉक्टर प्रकरणात पीएसआय बदने आणि बनकर हजर होणच संशयास्पद… सुषमा अंधारे यांच्या शंकेने खळबळ

Satara Doctor Death on Sushma Andhare : फलटणच्या महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या निधनानंतर एकच वादळ उठले असून गंभीर आरोप केली जात आहेत. धक्कादायक म्हणजे आरोपीच्या कुटुंबियांनीच महिला डॉक्टरवर आरोप केली.

महिला डॉक्टर प्रकरणात पीएसआय बदने आणि बनकर हजर होणच संशयास्पद... सुषमा अंधारे यांच्या शंकेने खळबळ
Satara Doctor Death and Sushma Andhare
| Updated on: Oct 27, 2025 | 1:04 PM

फलटण येथील रूग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. यादरम्यान त्यांनी तळहातावर एक नोट लिहित आत्महत्या केली. एक पीएसआय आणि अजून एका व्यक्तीचे नाव संपदा मुंडे यांनी त्या नोटमध्ये लिहिले होते. हेच नाही तर आपल्यावर चारवेळा बलात्कार पीएसआय गोपाळ बदने याने केल्याचे त्यांनी म्हटले. दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून पोलिसांकडून चाैकशी केली जातयं. आता नुकताच संपदा मुंडे प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केली आहेत. काल फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथ गेले आणि रणजित निंबाळकर यांना क्लीन चीट दिली ते आम्हाला कळलं नाही, असे त्यांनी म्हटले.

संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात रणजित निंबाळकर यांचेही नाव आल्याने एकच खळबळ उडाली. एसआयटीची स्थापना करून या प्रकरणात तपास केला जावा, अशी मागणी संपदा मुंंडे यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्याच चारित्र्यावर आरोपी प्रशांत बनकर याच्या कुटुंबियांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

सुषमा अंधारे यांनी म्हटले की, प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने हजर झाले, यामध्ये सर्व गोष्टी संशयास्पद वाटतात. बीडमधून अनेक ऊसतोड मजूर तिथे आणले जातात. अत्यंत अमानुष पद्धतीने कारखानदार त्यांच्याकडून उचली वसूल करून घेतात. निंबाळकर यांनी मेंटली टॉर्चर केलं त्यांना उचलून आणलं त्यांना शारीरिक इजा केल्या. प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाळ बदने हे ज्याप्रकारे हजर झाले, त्यावरच सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केला.

संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर लगेचच पीएसआय गोपाळ बदने हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी सातारा पोलिसांकडून काही पथके देखील तयार करण्यात आली होती. मात्र, त्याचे शेवटचे लोकेशन पंढरपूर येत होते. पोलिस सतत शोध घेत असतानाच बदने हा थेट फलटण पोलिस ठाण्यात पोहोचला. प्रशांत बनकर याच्या कुटुंबियांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन हो म्हणून सांगितले आणि पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.