छगन भुजबळांचा ताफा नांदेडमध्ये अडवला; सुप्रिया सुळे आक्रमक म्हणाल्या, हे तर फडणवीस…

Supriya Sule on Chhagan Bhujbal hingoli OBC Mahasabha and Devendra Fadnavis : आरक्षण प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला त्यांनी चढवला आहे. भुजबळांचा ताफा अडवल्या प्रकरणावरही त्या बोलल्या आहेत. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा...

छगन भुजबळांचा ताफा नांदेडमध्ये अडवला; सुप्रिया सुळे आक्रमक म्हणाल्या, हे तर फडणवीस...
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 2:32 PM

अविनाश माने, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : हिंगोलीत आज ओबीसी एल्गार महासभा होत आहे. अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ही सभा होत आहे. या सभेला जाण्याआधी छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आक्रमक होत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दि हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र सध्या अस्थिर झाला आहे. याचं अपयश इंटेलिजन्सचं आहे. याला जबाबदार गृहखात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

नितेश राणे यांना उत्तर

भाजप आमदार नितेश राणे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर करत पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असा सवाल केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप कोणी केला, मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत. याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

26/11 वर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आज 26/11… आजच्याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बलिदान देणाऱ्या सुपुत्रंसमोर नतमस्तक होते. हा दहशतवादी हल्ला मुंबई आणि देश कधीच विसरणार नाही. त्याग आणि बलिदान कधीच विसरणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या देशात बाळासाहेब ठाकरे एकच होऊन गेले. त्यांच्या नावाची हिंदुहृदसम्राट ही उपाधी कुणी घेऊ शकत नाही, असंही त्या म्हणाल्या.

राज्यात दुष्काळ…

महाराष्ट्रासमोर सगळ्यांत मोठं आव्हान भीषण दुष्काळ आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकार यावरून इतरांच लक्ष दूर करतेय. दुष्काळ,महागाई,बेरोजगारी या भीषण समस्या आहेत. दूध महाग झालंय, कांदा प्रश्न बिकट झालाय, शेतकऱ्याला टॅक्स भरावा लागतोय. दिल्लीतील केंद्र सरकार आता भ्रष्ट जुमला भाजप सरकार आहे. वाजपेयी, सुषमा स्वराज यांची ओरिजिनल सुसंस्कृत भाजप आता जूमला पार्टी झालंय, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सध्या जाती जातीत तणाव दिसत आहे. आरोप प्रत्याप रोप होत असतात. इलेक्शन होईल आता होतील यात सामान्य नागरिक भरडला जातो. सरकार रोज नवीन GR काढतात. ते नवीन ब्रिज बनवण्यात व्यस्त आहे. माझं सरकार सोबत भांडण होत असतं. शिक्षणाला महत्व द्यावं. असं मी नेहमी सांगते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.