AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI मुळे शत्रुघ्न सिन्हा सोशल मीडियावर ‘खामोश’; सैफ अली खानला समर्थन देताना बॉलिवूडच्या छेनू ने केली ही चूक

Shatrughan Sinha Saif Ali Khan : चार दिवसांपूर्वी सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला झाला. आज भल्या पहाटे पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणात शत्रुघ्न सिन्हा यांनी एक ट्विट केले. पण त्यात एक तांत्रिक चूक झाली. ती त्यांनी लागलीच दुरूस्तही केली, त्याची चर्चा रंगली आहे.

AI मुळे शत्रुघ्न सिन्हा सोशल मीडियावर 'खामोश'; सैफ अली खानला समर्थन देताना बॉलिवूडच्या छेनू ने केली ही चूक
शत्रुघ्न सिन्हा, सैफ अली खान
| Updated on: Jan 19, 2025 | 4:56 PM
Share

सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला. चार दिवसानंतर आज भल्या पहाटे हल्लेखोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो बांगलादेशी असल्याची पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे त्याचे नाव आहे. दरम्यान अभिनेता शत्रुघ्न सिन्हा हे सैफ अली खान याच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. त्यांनी समाज माध्यमावर याविषयीची प्रतिक्रिया दिली. पण ते करताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यावर युझर्सनी ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त केली.

शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले मत

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्वीट केले, “ आमचा अगदी जवळचा आणि लाडका सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात तो जखमी झाल्याचे दु:ख आहे. ही घटना दुर्दैवी आहे. देवाच्या कृपेने हे संकट टळले आहे. माझे आतापर्यंतचे सर्वात आवडते शो मॅन फिल्म निर्माता राज कपूर यांची नात करीना कपूर खान आणि कुटुंबाला देव शक्ती देवो. याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांनी हा खेळ थांबवावा ही विनंती. पोलीस चांगले काम करत आहे.”

Get Well Soon

शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्वीटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. सैफ अली खान हा एक चांगला कलाकार आहे. त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तो राष्ट्रीय पुरस्कार विजेता आहे. कायदा त्याचे काम करेल. प्रत्येक गोष्टी योग्य होतील, सैफ तू लवकर बरा हो, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हाकडून झाली ही चूक?

तुम्हाला वाटलं असेल यामध्ये तर काहीच चूक दिसत नाही. तर शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून मजकूरात कोणतीच चूक केली नाही. त्यांनी ट्वीट करताना एक फोटो शेअर केला. त्यावरून खरी गडबड झाली. कारण त्यांनी जे चित्र वापरले ते कृत्रिम बुद्धिमतेच्चा AI वापर करून तयार करण्यात आले होते. त्यावर मग युझर्सच्या कमेंटचा पाऊस पडला. त्यांनी हे चित्र खरं नसल्याचे आणि एआयच्या मदतीने तयार केल्याची माहिती दिली. ही चूक लक्षात येताच शत्रुघ्न सिन्हा यांनी एआय छायाचित्र न वापरता तीच पोस्ट शेअर केली आणि पहिले ट्वीट डिलिट केले.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.