मुंबई : काही वेळातच बीकेसीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray Rally Live) यांची हायव्होल्टेज सभा पार पडत आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर भाजप, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासहीत अनेकजण असणार आहे. मात्र या सभेतलं आणखी एक वेगळेपण समोर येतंय. ते म्हणजे या सभेत आदित्य ठाकरे हेही बोलणार आहे. आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या जनसागरासमोर काय बोलणार? याची उत्सुकता शिवसैनिकांच्या मनात आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या हुंकार सभेत पक्षाचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीही तोफ धडाडणार असल्यााची माहिती समोर आल्यापासून त्यावरूनही आता जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार असल्याने त्यामुळे शिवसैनिकांसाठी हा क्षण ऐतिहासिक असणार आहे.