पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा; आशिष शेलारांचा नवा बॉम्ब

| Updated on: Oct 01, 2021 | 5:34 PM

पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. (BJP leader ashish shelar alleges Rs 1,000 crore in pmrda development plan)

पीएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्यात 1 हजार कोटींचा घोटाळा; आशिष शेलारांचा नवा बॉम्ब
ashish shelar
Follow us on

मावळ: पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मावळमधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासी पट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरू आहे. त्यातून 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय, असा दावाही आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार आज मावळमध्ये आहेत. कामशेत, मावळ येथे समर्थ बुथ अभियान कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, दिगंबर भेगडे, पुणे ग्रामीण अध्यक्ष गणेश भेगडे आदीं उपस्थितीत होते. पीएमआरडीएच्या प्रस्तावित विकास आराखड्यात मावळमधील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आरक्षणे टाकून आणि नामधारी शेतकरी “विकासकांची” आरक्षणे निवासीपट्टा म्हणून खुली करण्याचा डाव सुरु आहे. यात 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात येतोय. शेतजमिनी, शेतघरे याची आरक्षणे बदलून शेतकऱ्यांना मारक ठरतील आणि अल्पभूधारक शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी आरक्षणे टाकली जात आहेत. एका शेतकरी कुटुंबाची अंदाजे 1 हजार एकर शेतजमीन निवासी म्हणून कशी खुली करण्यात आली? हा सगळा दहा हजार कोटीचा मामला आहे. या आराखड्यात 1 हजार कोटीचा घोटाळा असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज

राज्य दलाल चालवत आहेत. अनेक खाती दलालांकडून चालवली जात आहेत हे मी विधानसभेत उघड केले होते. तर गेल्या सात दिवसांपासून आपण पाहतोय की आयकर विभागाच्या काय कारवाया होत आहेत. आता तो माझा भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे असे सूचकपणे त्यांनी लक्षात आणून दिले. तर तीन पक्षांच्या सरकारचा उल्लेख करताना त्यांनी हे तीन पक्षाचं सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज आहे, अशी टीका केली.

निवडणुकीच्या कामाला लागा

महाविकास आघाडीतील तीन पक्षात आपसांत रोज लढाई लागलेली आहे. त्यातील दोन पक्षांचे जे संकेत मिळत आहेत. या सर्वांचा अभ्यास केला तर असे अनुमान काढता येईल की, राज्यात कधीही निवडणूक लागू शकतात. त्यामुळे जेव्हा केव्हा निवडणूका लागतील तेव्हा मावळमध्ये भाजपाचा आमदार निवडून आणायचा आहे, अशा तयारीला लागा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

भाजपचे नेतेही बूथ प्रमुखच होते

मावळ तालुक्यातील बूथ प्रमुखांचे चेहरे पाहिल्यावर मावळात कमळ फुलेल, असा विश्वास नक्की वाटतोय. बूथ प्रमुखच भाजपच्या यशाचा मानकरी आहे. देशातील भाजपचे जे प्रमुख नेते आहेत, ते सुध्दा सर्व जण एका बूथचे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं.

पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रीही वॉन्टेड

मावळमधील भाजप कार्यकर्त्याला पोलीस, सरकारी अधिकारी त्रास देत आहेत. असे जिल्हा अध्यक्षांनी भाषणात सांगितले. त्यावर, पोलीस, शासकीय अधिकाऱ्यांनी असं करु नये. ते तुमच्या हिताचं नाही. कायदेशीर ही नाही. योग्य नाही. जे बेकायदेशीर काम करत होते, ते गृहमंत्री असले तरी आता वॉन्टेड आहेत. पोलीस अधिकारीही असले तरी वॉन्टेड आहेत, असा इशाराही शेलार यांनी पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलाय.

सरकार गंभीर नाही

एमपीएसची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकरने आत्महत्या केल्यानंतर या विद्यार्थ्याला विधानसभेत ठाकरे सरकारने श्रध्दांजली वाहताना दिलेले आश्वासन सुध्दा पूर्ण करु शकले नाहीत. ही बाब दुर्दैवी असून सरळ सेवा भरतीसाठी रिक्त पदांची माहितीच सामान्य प्रशासन विभागकडे गोळा झाली नाही. दिलेली मुदत 30 सप्टेंबरला संपली. यावरुन तरुणांच्या विषयात सरकार किती गंभीर आहे हे दिसते, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

नांगरे पाटील म्हणजे मविआचे माफिया, सोमय्यांच्या नव्या आरोपानं खळबळ, नेमकं काय म्हणाले?

VIDEO : प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं… आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं

पंकजा मुंडेंना फोन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी आधी वाचा, ‘अनवेल’चं ट्विट

(BJP leader ashish shelar alleges Rs 1,000 crore in pmrda development plan)