पुणेकरांनी करुन दाखवलं, कोरोनाला हरवून दाखवलं, महापौर मोहोळांची प्रतिक्रिया वाचून सगळ्यांनाच अभिमान वाटेल!

| Updated on: Oct 21, 2021 | 7:32 AM

कोरोना रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने जीवाचं रान केलं. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेरांनीही भक्कम साथ दिली. आज समस्त पुणेकरांच्या साथीला आणि महापाालिकेच्या प्रयत्नांना यश आलंय.

पुणेकरांनी करुन दाखवलं, कोरोनाला हरवून दाखवलं, महापौर मोहोळांची प्रतिक्रिया वाचून सगळ्यांनाच अभिमान वाटेल!
मुरलीधर मोहोळ (महापौर, पुणे)
Follow us on

पुणे : महाराष्ट्रात ज्या शहरांत सर्वाधिक कोरोनावाढ झाली, त्या शहरांपैकी पुण्याचं नाव सर्वांत अग्रभागी घ्यावं लागेल. तसंच पुण्यात कोरोनाची मृत्यूसंख्याही बरीच होती. हीच रुग्णवाढ आणि मृत्यूसंख्या रोखण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे महापालिकेने जीवाचं रान केलं. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांना पुणेरांनीही भक्कम साथ दिली. आज समस्त पुणेकरांच्या साथीला आणि महापाालिकेच्या प्रयत्नांना यश आलंय. 6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच पुण्यात काल कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. असं असलं तरी महापौरांनी याचं सर्व श्रेय पुणेकरांना दिलंय. त्यांनी श्रेयासाठी कोणताही हक्क सांगितलेला नाही.

व्वा, पुण्यात काल कोरोनाने एकही मृत्यू नाही

पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झालेली नाही. पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. काल (बुधवार) तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.6 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमचं पुण्यात कोरोनामुळं एकही मृत्यू झालेला नाही. पुण्याच्या महापौरांनी यासंदर्भात ट्विट करुन आनंद व्यक्त केला आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, पुणेकरांनी करुन दाखवलं!

कोरोना काळात केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न होतो. मग तो औषध पुरवठा असो, हॉस्पिटल्सला मदत असो वा कोरोनावर नियंत्रण असो… राजकारणी मंडळी श्रेय घेण्यासाठी वाटेल तेव्हा पुढे येतात. पण पुण्यात पहिल्यांदा कोरोनाला अटकाव घालून आता मृत्यूसंख्याही रोखली गेली पण महापौर मोहोळ यांनी मात्र श्रेय घेण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही.

‘पुणे महापालिकेने उभी केलेली आरोग्य, व्यापक पातळीवर केलेले लसीकरण आणि सण-उत्सवाच्या काळात पुणेकरांनी दिलेली साथ, यामुळे शहरातील कोरोना संसर्गस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शिवाय ६ फेब्रुवारी २०२१ नंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर येणे हा मोठा दिलासा असून पुणेकरांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे’, असं म्हणत रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या रोखल्याचं संपूर्ण श्रेय मोहोळ यांनी पुणेकरांना दिलंय.

श्रेयासाठी भांडणाऱ्या नेत्यांमध्ये महापौर मोहोळ अपवाद

श्रेयासाठी भांडणाऱ्या नेत्यांमध्ये महापौर मोहोळ हे अपवाद असावेत. मुरलीधर मोहोळ राज्यातले एकमेव महापौर असावेत जे अजूनही नु चुकता ट्विटरवरुन दररोज पुण्यातली कोरोना परिस्थिती आणि ग्राऊंड रिपोर्ट, आकडे सांगत असतात. एकंदरित काही अपवाद वगळता मुरलीधर मोहोळ यांचं कोरोनाकाळातलं काम सर्वाधिक वाखण्याजोगं आहे. त्यांच्या विरोधकांनीही त्यांचं अनेकदा कौतुक केलंय.

पुणे कोरोना रिपोर्ट

पुण्यात काल (बुधवार)  दिवसभरात 112 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर, काल दिवसभरात 118 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातही कोरोनाच्या मृत्यूची संख्या शुन्यावर आली आहे.  पुण्यात सध्या 151 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 5 लाख 3 हजार 469 पर्यंत पोहोचली आहे.   पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 988 वर पोहोचली आहे.  पुण्यातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या 9067 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 493414 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात आज 5986 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

पुणेकरांसाठी गुड न्यूज, आज एकही कोरोना मृत्यू नाही, 8 महिन्यानंतर पहिल्यांदाचा सुटका