रोल्स रॉयल्सपासून ते रेंज रोवरपर्यंत आलिशान कारचे साम्राज्य; सावकार नानासाहेब गायकवाड याच्या गाड्या जप्त

Nanasaheb Gaikwad : वैष्णवी हगवणे प्रकरणात विविध अँगल समोर येत आहे. त्यात आयपीएस जालिंदर सुपेकर हे अडचणीत आले. तर आता त्यांच्यावर खंडणीचा आरोप करणारे नानासाहेब गायकवाड याची मायानगरी समोर आली आहे.

रोल्स रॉयल्सपासून ते रेंज रोवरपर्यंत आलिशान कारचे साम्राज्य; सावकार नानासाहेब गायकवाड याच्या गाड्या जप्त
सावकारीच्या जीवावर ना ना आलिशान कार
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 06, 2025 | 9:20 AM

वैष्णवी हगवणे प्रकरणात अजून इतर अनेक बाबी समोर आल्या. त्यात हगवणे कुटुंबियांचा नातेवाईक आणि आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली. तर त्यांच्यावर खंडणीचा आरोप करणारा पुण्यातील सावकार नानासाहेब गायकवाड याची मायानगरी आणि घबाड पोलिसांसमोर आले. त्याच्याकडून पोलिसांनी रोल्स रॉयल, रेंज रोवर, पजेरो, मर्सडिज आणि इतर आलिशान कार जप्त केल्या. या कोट्यवधींच्या कारचा पसारा पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले.

लोकांकडून लुबाडलेल्या पैशावर गायकवाडची मायावीनगर उभारली आहे. लोकांच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या. व्याजाच्या या गोरखधंद्यात त्याने मोठी माया कमावली. नाना आणि गणेश गायकवाड पिता पुत्रांवर चार वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळे दोन मोक्काचे दाखल करत कारागृहात रवानगी केली. दोघेही दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते.

आलिशान कारचा ताफा

वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेल्या पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांनी कोट्यावधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. तर गायकवाड याच्यावर सुद्धा गु्न्हे दाखल होते. हे गुन्हे दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी गणेश गायकवाड यांच्या अनेक आलिशान कार जप्त केल्या. त्या कार चतुर्शिंगी पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या आहेत. त्यामध्ये मर्सिडीज,रोल्स रॉयल रेंज-रोवर,ऑडी,पजेरो,लँड क्रूझर अशा आलिशान कार पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडल्या आहेत.

सगळ्या वाहनांचा आकर्षक क्रमांक

-मर्सिडीज-JH 12 F 4444

रोल्स रॉयल्स-MH 12 RF 4444

रेंज रोव्हर-J H 10 K 4444

इनडेव्हर -MH 12 TH 4444

पजेरो-MH 12 HB 4444

ऑडी-MH 14 GY 4444

शशांकला न्यायालयात हजर करणार

शशांक हगवणे आणि लता हगवणे या दोघांना पोलीस आज खेड न्यायालयात हजर करणार आहेत. जेसीबी विक्री करून फसवणूक आणि धमकी प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना अटक केली होती खेड न्यायालयाने दोघांना 3 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. आज दोघांची पोलिस कोठडी संपत असल्याने महाळुंगे पोलिस खेड न्यायालयात हजर करणार आहेत. दुपारी तीन वाजता खेड न्यायालयात हजर करण्यात येईल.

निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याची चौकशी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना कसा मिळाला, याची चौकशी करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहे.

चव्हाणला 2022 मध्ये शस्त्र परवाना देण्यात आला, पुणे पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना नाकारल्यानंतर मंत्रालयातून मिळवून देण्यासाठी कोणी मदत केली हा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर त्या व्यक्तीला मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते. मंत्रालयात उपसचिव किंवा गृहराज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन त्याबाबत निर्णय घेतला जातो. परवाना मिळण्यासाठी चव्हाणने मंत्रालयात अपील केले होते

तेव्हा वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गंभीर गुन्हा दाखल होता त्याच्या पत्नीनेच त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.गृहमंत्रालयाकडून अर्जाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयातून चव्हाण संदर्भात काही गुन्हे दाखल आहेत का? याची विचारणा केली होती मात्र त्या संदर्भात कोणतीच माहिती गृहमंत्रालयाला देण्यात आली नाही.