Maratha Reservation : पुनर्विचार याचिका फेटाळली, आता संभाजीराजेंनी अखेरचा पर्याय सांगितला

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एससीबीसी करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट होत आहे. (Maratha reservation)

Maratha Reservation : पुनर्विचार याचिका फेटाळली, आता संभाजीराजेंनी अखेरचा पर्याय सांगितला
खासदार संभाजी छत्रपती
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 11:05 AM

पुणे: सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एससीबीसी करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे. (sambhaji chhatrapati asks Centre to amend Constitution to Maratha reservation)

खासदार संभाजी छत्रपती आज पुण्याच्या वाघोलीत आले होते. आजपासून त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी आता दोनच पर्याय उरले आहेत. 102 वी घटनादुरुस्ती ही राज्याचे अधिकार अबाधित आहेत असं केंद्राने रिव्ह्यू पिटीशनमध्ये म्हटलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. त्यामुळे राज्याला काही पर्याय नाही. आता दुसरा मार्ग 318 ब च्या मार्गातून मागासवर्ग आयोग तयार करुन, गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करुन सर्व डाटा गोळा करावा लागेल. हा डाटा राज्यपालांच्याद्वारे राष्ट्रपतींना पाठवतील. मग राष्ट्रपती त्यांना वाटलं तर 342 अ नुसार केंद्रीय मागास आयोगाला पाठवू शकतात, मग ते राज्य मागास आयोगाला पाठवतील, मग राष्ट्रपतींना पटलं तर संसदेला देऊ शकतात, असं संभाजीराजे म्हणाले.

केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी

दुसरा एक पर्याय आहे. केंद्र सरकारने वटहुकूम काढावा. त्यामुळे घटना दुरुस्ती करण्याचा मार्ग मोकळा होईल आणि घटना दुरुस्ती झाल्यावर राज्याला अधिकार मिळेल, असं सांगतानाच आता मराठा आरक्षणावर केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करावी लागेल. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे सांगावं लागेल. राज्य आणि केंद्राला एकमेकांकडे बोट दाखवता येणार नाही. राज्य सरकार फार फार तर शिफारस करू शकते. आता केंद्राचीच मुख्य भूमिका आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

राज्याकडे पाच मागण्या

आम्ही राज्याला पाचसहा मागण्या केल्या आहेत. सारथीपासूनच्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाशी संबंधित या मागण्या आहेत. त्यातील बऱ्याच मागण्यांवर काम सुरू झालं आहे. प्रशासकीय कामकाजासाठी वेळ देणं भाग आहे, असं ते म्हणाले. तसेच राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेला कायदा फुलप्रुफ नव्हता हे सिद्ध होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मूक आंदोलन स्थगित नाही

कोल्हापूर आणि नाशिकला मूक आंदोलन झालं. सध्या या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, आम्ही जनसंवाद दौरा सुरू केला आहे. पुण्याच्या वाघोलीतून या दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मराठवाडा आणि विदर्भात जाऊन तिथल्या मराठा संघटनांशी संवाद साधण्यात येणार आहे, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. (sambhaji chhatrapati asks Centre to amend Constitution to Maratha reservation)

संबंधित बातम्या:

निवडणूक व्हायला नको होती, पण कितीही आपटा, जिंकणार तर आम्हीच: संजय राऊत

गुप्त बैठकींचा सिलसिला, देवेंद्र फडणवीस-अमित शाहांची गुप्त बैठक, मग मोदींशीही चर्चा, काय ठरलं?

महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडात हजारो कोटी जमा, मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या, शिवसेनेची मागणी

(sambhaji chhatrapati asks Centre to amend Constitution to Maratha reservation)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.