उठ दुपारी आणि घे सुपारी, राज ठाकरेंवर ठाकरे गटाच्या नेत्याचा निशाणा

महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र त्यांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहे.विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्यानेही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उठ दुपारी आणि घे सुपारी, राज ठाकरेंवर ठाकरे गटाच्या नेत्याचा निशाणा
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 11:04 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा काल (मंगळवार) दुपारी शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या सभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. मात्र त्यांच्या या निर्णयानंतर विविध पडसाद उमटत आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेचे महायुतीच्या नेत्यांनी स्वागत केले तर इतर विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्या या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना राज ठाकरे यांचा हा निर्णय काही आवडलेला नाही.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनीही राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. ‘राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही. राज ठाकरेंचं कसं आहे, उठ दुपारी आणि घे सुपारी यातला प्रकार आहे’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

राज ठाकरे खूप चालू माणूस

मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केल्यावर शरद कोळी यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला नाही. जर त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल तर त्यांनी एक नाही अनेक पोळी भाजून घेण्यासाठी हा पाठिंबा दिला असेल. राज ठाकरेंचं कसं आहे, उठ दुपारी आणि घे सुपारी यातला प्रकार आहे, असं कोळी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी राज ठाकरे यांना चांगलाच दम भरला असेल. त्यामुळे राज ठाकरेंची फाटली असेल. त्यामुळेच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असेल. अन्यथा राज ठाकरे काय बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यातला माणूस आहे का? असा सवालही कोळी यांनी विचारला. ‘ राज ठाकरे खूप चालू माणूस आहे. गेम केला असेल आणि मग पाठिंबा दिला असेल. राज ठाकरेंकडे काही पर्याय राहिलेला नसेल. त्यामुळेच त्यांना भाजपाला पाठिंबा द्यावा लागला असेल, नाहीतर ईडीच्या दरवाजात जावं लागेल’ अशी शंका व्यक्त करत कोळी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

मनसे पदाधिकाऱ्याचा राजीनामा

राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर पक्षातही पडसाद उमटले आहेत. त्यांच्या या भूमिकेच्या विरोधात मनसे सरचिटणीस कीर्तीकुमाकर शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. मनसेत पडलेली ही पहिली ठिणगी आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होते. तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सभांना मी उपस्थित होतो. सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात ते विचार मांडत होते. २०१९ मध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होता. आता ते पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर विश्वास ठेऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत आहे, असे कीर्तीकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. यामुळे सरचिटणीस पदावरुन आपण राजीनामा देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.