
पाटणा : बिहारची राजधानी पाटणाजवळील धनरुआ येथे एका 60 वर्षाच्या व्यक्तीने अवघ्या 19 वर्षांच्या (60 year old groom and 19 year old bride) तरुणीशी लग्न केले आहे. लग्न झाल्यानंतर म्हातारा पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा गावातील लोकं तर थक्क होऊन पहात राहिले. या विवाहाबद्दल त्या इसमाच्या मुलीने त्याला जाब विचारण्याच्या प्रयत्न केला असता, त्याने मुलीलाच घरातून हाकलून दिले. एवढेच नव्हे तर तो इसम आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करण्याची धमकीही देत आहे. हे धक्कादायक प्रकरण धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ओमप्रकाश असे या वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या पत्नीचे 6 वर्षांपूर्वी निधन झाले होते.
ओमप्रकाश यांना तीन मुली आहेत. त्यांच्या दोन मुलींची लग्नं झाली आहेत. तर तिसरीचा विवाह अद्याप व्हायचा आहे. ओमप्रकाश यांच्या नावावर फोरलेन रोडजवळ बरीच जमीन आहे. या जमिनीचे आमिष दाखवून त्याने 19 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिला घरी आणले.
3 मे रोजी केले लग्न
ओमप्रकाश यांची छोटी मुलगी सोनालीने वडिलांच्या या कृत्याला विरोध केल्यावर त्यांनी तिला घरातून बाहेर काढले. एवढेच नाही तर तिला मालमत्तेतून हाकलून देण्याची धमकीही दिल्याने सोनालीने तिच्या वडिलांविरोधात धनरुवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनालीने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या वडिलांनी 3 मे रोजी एका 19 वर्षीय मुलीशी लग्न केले आणि 17 दिवसांनी सोमवारी ते तिला घरी घेऊन आले. त्याने मुलीच्या कुटुंबीयांना आपली मौल्यवान जमीन देण्याचे आमिष दाखवले आणि त्यानंतर 19 वर्षीय तरुणीशी लग्न केले. पत्नीसह घरी आल्यानंतर मुलीने त्यांना विरोध केला असता त्यांन मुलीला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले.
पोलिस येताच वृद्ध फरार
त्यानंतर सोनालीने 112 वर फोन करून पोलिसांना बोलावले. याठिकाणी पोलिसांना माहिती देताच वृद्ध पत्नीसह फरार झाला. या वृद्धाने आपल्या लग्नाचा खर्च करण्यासाठी ६ लाख रुपयांची लाखांची एफडी ही ( Fixed Deposit) तोडल्याचे सांगण्यात येत आहे. ही रक्कम त्यांनी त्यांची लहान मुलगी सोनालीच्या लग्नासाठी नदवान येथील बँकेत जमा केली होती. मुलीच्या तक्रारीनंतर पोलीस आरोपी वडिलांचा शोध घेत आहेत. 60 वर्षीय व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीसोबत लग्न केल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.