
कोरोनामुळे आता चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत. या सगळ्या चित्रपटांची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्ही या वीकेंडला हे चित्रपट पाहून स्वतःचं मनोरंजन करू शकता.

भुज द प्राईड ऑफ इंडिया : अजय देवगणच्या ‘भुज’ या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. हा चित्रपट 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे. अजय देवगण चित्रपटात स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिकच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजयसोबत नोरा फतेही, सोनाक्षी सिन्हा, एमी विर्क, संजय दत्त आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘द किंगडम’ : द किंगडम हा स्पॅनिश ड्रामा चित्रपट आज प्रदर्शित होणार आहे. हा आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते.

मॉडर्न लव्ह 2 : मॉडर्न लव्ह वेब सीरिजचा सीझन 2 आज रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना पहिला सीझन चांगलाच आवडला, त्यानंतर सीझन 2 आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मालिकेची कथा न्यूयॉर्क टाइम्सच्या लोकप्रिय स्तंभावर आधारित आहे.

शांतीत क्रांती : शांती क्रांती ही तीन मित्रांची कथा आहे जे एका रोड ट्रिपवर जातात. ही रोड ट्रिप मजा, भावनांनी भरलेली असणार आहे. याची संपूर्ण कथा मैत्रीवर आधारित आहे. शांती क्रांतीमध्ये मराठी अभिनेते अभय महाजन, आलोक राजवाडे आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसतील.