
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक-फलंदाज टिम सेफर्टचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात निवड करण्यात आला आहे. युवा फलंदाज जेकब बेथेल आरसीबीच्या आगामी सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सेफर्टची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड संघात जेकब बेथेलची निवड करण्यात आली आहे आणि 26 मे नंतर इंग्लंडला परतेल. आरसीबीने आता त्याच्या जागी टिम सेफर्टची निवड केली आहे.

टिम सेफर्ट हा न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. किवी संघासाठी आतापर्यंत 66 टी20 सामने खेळणाऱ्या सेफर्टने 63 डावांमध्ये 1540 धावा केल्या आहेत. त्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये टिम सेफर्टने आतापर्यंत त्याच्या 80 षटकार आणि 131 चौकार मारले आहेत.

आरसीबी संघाचा भाग असलेला टिम सेफर्ट यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. या काळात त्याने तीन आयपीएल सामने खेळले आणि फक्त 26 धावा काढल्या. म्हणून यावेळी, कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी केले नाही.

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी एनगिडी या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला परतणार आहे. त्यामुळे आरसीबीने एनगिडीऐवजी मुजरबानीची निवड केली आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)