
आयपीएल 2025 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने एक मोठा पल्ला गाठला आहे. आयपीएल स्पर्धेत हर्षल पटेलने 150 विकेट पूर्ण केल्या आहेत. हर्षल पटेलने 4 षटकात 49 धावा देत 1 गडी बाद केला. (फोटो - आयपीएल/बीसीसीआय)

लखनौ सुपर जायंट्सचा एडन मार्करम त्याचा 150 वा विकेट ठरला. इकाने स्टेडियममध्ये आक्रमकपणे खेळणाऱ्या मार्करमला 61 धावांवर असताना क्लिन बोल्ड केला. हर्षल पटेलने 117व्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. लसिथ मलिंगाने ही कामगिरी 105 सामन्यात केली आहे. (फोटो - आयपीएल/बीसीसीआय)

आयपीएल इतिहासात हर्षल पटेल 150 विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे. यापूर्वी भुवनेश्वर कुमारने 193, ड्वेन ब्रावोने 183, जसप्रीत बुमराहने 178 आणि लसिथ मलिंगाने 170 विकेट घेतल्या आहेत. फिरकीपटूंसह क्रमावारी पाहीली तर हर्षल पटेल 12वा गोलंदाज आहे. (फोटो - आयपीएल/बीसीसीआय)

हर्षल पटेलने 2381 चेंडूत 150 विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. यासह त्याने मलिंगाला मागे टाकलं आहे. मलिंगाने 2444 चेंडूत 150 विकेट पूर्ण केल्या होत्या. चहलने 2543 चेंडूत, ब्रावोने 2656 चेंडूत, तर बुमराहाने 2832 चेंडूत 150 विकेट्सचा पल्ला गाठला आहे. (फोटो - आयपीएल/बीसीसीआय)

हर्षल पटेलने 2012 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल करिअर सुरु केलं होतं. आता सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. हर्षल पटेलने पाचवेळी 4 विकेट आणि एकवेळा पाच विकेट घेतल्या आहेत. दोन वेळा पर्पल कॅप मिळवली आहे. (फोटो - आयपीएल/बीसीसीआय)