AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात, महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार

आगामी काळात महापालिकासह पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ही विधान भवनात होणार आहे. त्या बैठकीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात, महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
ReporterSameer Bhise
ReporterSameer Bhise | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 23, 2022 | 7:41 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज प्रथमच (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे हे विधानभवनात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हे विधानभवनात येणार अशी चर्चा कालपासूनच रंगली होती. अखेर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत आ. आदित्य ठाकरे हे एकाच वेळी (Legislative Assembly) विधानभवनात दाखल झाले होते. दरम्यान,  (MVA) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार असून या बैठकीला ते हजर राहिले आहेत. उद्धव ठाकरे दाखल होताच उपस्थितांनी घोषणा देण्यास सुरवात केली होती. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रथमच विधानभवनात आल्याने एक वेगळाच माहोल बनला होता.

आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने खलबते

आगामी काळात महापालिकासह पंचायत समिती, नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने महाविकास आघाडीची महत्वाची बैठक ही विधान भवनात होणार आहे. त्या बैठकीलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला महाविकास आघाडीतील तीनही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नेमकी काय रणनिती ठरते हे पहावे लागणार आहे.

राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच विधानभवनात

शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे सत्तांतर झाले आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता आमदारकीचाही राजीनामा देणार अशी चर्चा होती, पण त्यांनी आपल्या निर्णयात बदल केला. त्यानुसार आज महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले आहे. ते विधान भवनाच्या आवारात येताच सर्वांनी त्यांना गराडा घातला होता. तर अनेकांनी घोषणाही दिल्या होत्या.

विविध विषयांवर होणार चर्चा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पहिल्यांदाच विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये होणाऱ्या या बैठकीत आगामी निवडणुकांबरोबर सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आता घटनापीठ हेच सुनावणी घेणार आहे. त्यामुळे याबाबतीतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...