Pandharpur Wari 2022: इंदापूर तालुक्यातील सनसर येथे विसावणार तुकोबारायांची पालखी

विठूनामाचा गजर करत देहू (Dehu)  येथून  प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांची पालखी (Sant Tukaram maharaj Palkhi 2022)  टाळ-मृदूंगाच्या नादात विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज इंदापूर तालुक्यातील सनसर येथे मुक्काम असणार आहे. कोरोना निर्बंधामुळे गेले दोन […]

Pandharpur Wari 2022: इंदापूर तालुक्यातील सनसर येथे विसावणार तुकोबारायांची पालखी
नितीश गाडगे

|

Jul 01, 2022 | 9:21 AM

विठूनामाचा गजर करत देहू (Dehu)  येथून  प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांची पालखी (Sant Tukaram maharaj Palkhi 2022)  टाळ-मृदूंगाच्या नादात विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संत तुकारामांच्या पालखीचा आज इंदापूर तालुक्यातील सनसर येथे मुक्काम असणार आहे. कोरोना निर्बंधामुळे गेले दोन वर्ष पंढरपूर वारीला ब्रेक लागला होता. विठुरायाच्या कृपेने यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला आहे, त्यामुळे वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातवरण आहे. वारकरी सांप्रदायात तुकोणाच्या वारीला विशेष महत्त्व असते. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात, त्यामुळे या वारीचा विशिष्ट अनुभव असतो.

हे सुद्धा वाचा

यंदा 10 जुलैला पार पडणार्‍या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी 20 जूनला देहू  मधून संत तुकाराम महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून प्रस्थान केले. यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारी करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तुकारामांच्या पालखीमध्ये ‘रिंगण’ हे विशेष आकर्षण असते. यामध्ये ‘गोल रिंगण’ आणि उभे रिंगण अशा दोन प्रकारचे रिंगण पाहता येतात. गोल रिंगणामध्ये पालखी भोवती  भक्त  मानवी साखळी करतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकाच घोडयावर घोडेस्वार असतो.तर  दुसर्‍या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकर्‍यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वाराकर्‍यांची गर्दी असते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात. यंदा ताब्बाडाला दोन वर्षानंतर हे सर्व अनुभवता येणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें