Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग करा वास्तुशास्त्रामधील हे चार सोपे उपाय

अनेकांसोबत असं होतं की काहीही कारण नसताना घरात सतत भाडणं होतात, पती-पत्नीचं पटत नाही. हे कदाचित तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषामुळे होऊ शकतं. आज आपण असा वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात शांतता, सुख आणि समृद्धी येईल.

Vastu Shastra : घरात सतत भांडणं होतायेत? मग करा वास्तुशास्त्रामधील हे चार सोपे उपाय
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 03, 2026 | 10:00 PM

अनेकांच्या आयुष्यात अचानक असे प्रसंग निर्माण होतात की सगळं सुरळीत सुरू असतं, परंतु अचानक घरात काहीही कारण नसताना भांडणाला सुरुवात होते. घरातील कुटुंबप्रमुखाचे घरातील इतर सदस्यांसोबत भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. कधी कधी तर तणाव एवढा वाढतो की परिस्थिती पार घटस्फोटापर्यंत देखील जाते. जर तुमच्या घरात सतत भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम हा तुमच्या मुलांच्या मनावर देखील होतो. ते  देखील सारखे चिडचिड करतात. आपल्यासोबत असं का होतय? याचा आपण विचार करतो, मात्र आपल्याला काही केल्या त्याचं उत्तर सापडत नाही, तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषामुळे देखील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या कुटुंबावर होतो, आणि घरात गृह कलह वाढतो. आज आपण वास्तुदोष दूर करण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

राधा कृष्णाचा फोटो – जर पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील, पटत नसेल तर अशावेळी तुमच्या बेडरूममध्ये राधा-कृष्ण यांचा फोटो लावण्याचा सल्ला दिला जातो. हा फोटो लावताना फक्त एक काळजी घ्यावी कधीही एकटी राधा किंवा एकटा कृष्ण असा फोटो लावू नाही, दोघांचा जोडीने फोटो लावावा.

काटेरी वनस्पती घरातून काढून टाका – जर तुमच्या घरात काटेरी वनस्पती असतील तर त्या आजच काढून टाका. गुलाब आणि कोरफड या दोन काटेरी वनस्पती वगळता एकही काटेरी वनस्पती घरात नसावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तरी देखील ही समस्या निर्माण होते. त्यामुळे दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर पिंपळाला प्रदिक्षणा मारा, यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते.

घरात कधीही युद्धाचा प्रसंग किंवा हिंस्र प्राण्यांचे फोटो लावू नका, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us