AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घरात शमीचं रोप का लावावं? वास्तुशास्त्रात सांगितलेत फायदेच फायदे

वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक झाडं, रोपं सांगण्यात आले आहेत, ते जर तुमच्या घरात असतील तर तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होऊन ऊर्जा संतुलन साधलं जातं. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. आज आपण शमीच्या झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहेत.

Vastushastra : घरात शमीचं रोप का लावावं? वास्तुशास्त्रात सांगितलेत फायदेच फायदे
वास्तुशास्त्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 10:09 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडं सांगण्यात आली आहेत, ती झाडं घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. या झाडांमुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, वास्तुदोष दूर होतो. या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या दैनदिन आयुष्यावर होतो. अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, आयुष्यात कधीही पैशांची कमी भसत नाही. तसेच घरात सुख, शांती, समृद्धी येते. आज आपण अशाच एका झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत हे झाड आहे शमीचं झाड. शमीच्या झाडाला वास्तुशास्त्र तसेच हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. विविध धार्मिक कार्यात देखील शमीच्या पानाचा आणि त्यांच्या लाडकडाचा वापर केला जातो. त्यामुळेच शमीचं झाडं घरात लावणं हे वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या घराच्या परिसरात किंवा एखाद्या मंदिर परिसरात देखील शमीचं झाडं लावू शकतात. दसऱ्याच्या दिवशी देखील शमीच्या झाडाची पूजा केली जाते. चला तर मग जाणून घेऊयात शमीचं झाडं घरात का लावावं.

शनीदोष निवारण – जर एखाद्या व्यक्तीला शनीची साडेसाती सुरू असेल तर अशा व्यक्तीने घरात शमीचं रोप लावलं पाहिजे, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. जर तुमच्या घरात शमीचं रोप असेल तर शनीदोष दूर होतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येतात, त्या देखील कमी होतात. घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे त्याचा सकारात्म परिणाम हा तुमच्या मानसिक आणि शारीरीक आरोग्यावर होतो. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

वाईट नजरेपासून संरक्षण – जेव्हा एखाद्या घराला किंवा घरातील व्यक्तीला कोणाची वाईट नजर लागते, तेव्हा अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या येतात, घरावर आर्थिक संकट येतात. काहीही कारण नसताना घरात सारखी भांडणं होतात. मात्र जर तुमच्या घरात शमीचं झाडं असेल तर तुमचं सर्व प्रकारच्या वाईट नजरेपासून संरक्षण होतं. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आर्थिक समस्या – अनेकांसोबत असं होतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसा कमवतात. परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. अनावश्यक खर्चात वाढ होते. यामागे तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. ज्या घरात शमीचं झाड आहे, त्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच घरात शमीचं झाड लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री...
बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्री....
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा...
कर्नाटकात मोठा उलटफेर, सिद्धरामय्यांनी राजीनामा देताच ठरला नवा....
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात
केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, नीट परीक्षेसाठी थेट लष्कर मैदानात.
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक
बनावट सही करून खातं साफ; महिला डॉक्टरची लाखोंची फसवणूक.
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान
मोठी बातमी! कोल्हापुरात गंभीर प्रकरणी भाजप नेत्याला अटक, थेट राजस्थान.
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार
अगोदर थुंकला अन् बनवली रोटी, मुंबईत हॉटेलमध्ये किळसवाणा प्रकार.
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट..
Thane | शिंदेच्या खेळीला भाजपाकडून धक्का? बविआतील राजीव पाटलांशी भेट...
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार....
17 जागांवरून महायुतीत चर्चा; शिरसाट म्हणाले तिढा आजच सुटणार.....
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला.
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक
मोठी अपडेट! NEET पेपरफुटी प्रकरणी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक.