GT vs MI IPL 2023 : राशिद खान याने 47 वेळा केलेला प्रयत्न ठरला निष्फळ, आतातरी यश मिळणार का?

आयपीएल 2023 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. पण या सामन्यापूर्वी राशिद खानच्या प्रयत्नांची चर्चा होत आहे. आतातरी यश मिळणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.

GT vs MI IPL 2023 : राशिद खान याने 47 वेळा केलेला प्रयत्न ठरला निष्फळ, आतातरी यश मिळणार का?
GT vs MI IPL 2023 : राशिद खानने 47 वेळा प्रयत्न करून पाहिला पण हाती काहीच लागलं नाही, आता...Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 5:34 PM

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होत आहे. गुजरात आणि मुंबई या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे. हा सामना गुजरातच्या होमग्राउंडवर होत असून क्रीडाप्रेमींच्या नजरा राशिद खानच्या कामगिरीकडे लागल्या आहेत. या सामन्यातही राशिद खान आणि सूर्यकुमार यादव यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंची कामगिरी जबरदस्त आहे. मात्र दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले की सूर्यकुमार यादव उजवा ठरतो. पण महत्त्वपूर्ण सामन्यात दोन्ही खेळाडू कसर सोडणार नाहीत, हे सुद्धा तितकंच खरं आहे.

आयपीएल 2023 स्पर्धेत राशिद खानने आतापर्यंत 25 गडी बाद केले आहेत. मुंबई विरुद्धच्या दोन सामन्यात एकूण 6 गडी नावावर केले आहे. मात्र इतकं असूनही सूर्यकुमार यादवला बाद करण्यात अपयश आलं आहे. सूर्यकुमारने राशीच्या गोलंदाजीची सर्व अस्त्र परतवून लावली आहेत.

आयपीएल इतिहासात दोन्ही खेळाडूंचा 9 सामन्यात आमनासामना झाला आहे. यात सूर्यकुमार यादवने राशिद खानच्या 47 चेंडूचा सामना केला आहे. यात 142 च्या स्ट्राईकने 67 धावा केल्या आहेत. मागच्या सामन्यात तर सूर्यकुमार यादवने सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे सूर्याकुमार लगाम घालण्यासाठी राशिदची 4 षटकं महत्त्वाची ठरणार आहेत.

राशिद खानने आयपीएलच्या 10 प्लेऑफ सामन्यात 10 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट फक्त 5.21 आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादवचं वानखेडे बाहेरचं प्रदर्शन ठिकठाक आहे. सूर्याने 8 डावात 177 धावा केल्या आहेत. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

गुजरातचा पूर्ण स्क्वॉड : हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, शुभमन गिल, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, बी साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, जयंत यादव, प्रदीप सांगवान, राहुल तेवतिया, शिवम मावी, विजय शंकर, अलजारी जोसफ, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, यश दयाल, केन विलियमसन, जोशुआ लिटिल, ओडीन स्मिथ, उर्विल पटेल, केएस भरत आणि मोहित शर्मा.

मुंबईचा पूर्ण स्क्वॉड: रोहित शर्मा, कॅमरुन ग्रीन, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टिम डेविड, पीयूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन आणि ट्रिस्टन स्टब्स.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.