इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण

| Updated on: Aug 22, 2021 | 11:48 AM

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत 1-0 ची आघाडी घेतली आहे.

इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो Unlucky, हे आहे त्यामागील कारण
इंग्लंड कसोटी संघ
Follow us on

लंडन : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. कर्णधार जो रूट (Joe Root) आणि कंपनीसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी (22 ऑगस्ट) त्यांना सामना खेळावा लागणार नाही. कारण आजचा दिवस इंग्लंड क्रिकेटसाठी अत्यंत अशुभ आहे. याचे कारणही तसेच आहे. इतिहासात याच दिवशी वेगवेगळ्या वर्षात दोन वेळा इंग्लंड संघाला महत्त्वाच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात महत्त्वाची भूमिका गोलंदाज पार पाडत आहेत. असंच काहीसं तेव्हाही झालं होतं जेव्हा क्रिकेट इतिहासातील दोन महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडचा संघ पराभूत झाला होता. दोन्ही वेळा 22 ऑगस्टचाच दिवस होता, अन् वर्ष होतं 1930 आणि 1934. प्रसिद्ध अशा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एशेज सीरीजची ही गोष्ट सुरु असून दोन्ही वर्षी इंग्लंडला एकाच दिवशी पराभव पत्करावा लागला होता.

1930 मधील इंग्लंडचा पराभव

सगळ्यात आधी 1930 मध्ये एशेज सीरीजचा शेवटचा म्हणजेच पाचवा कसोटी सामना सुरु होता. ओवलच्या मैदानावर 16 ऑगस्ट रोजी सुरु झालेला हा सामना पाच नाही तर तब्बल सात दिवस चालला.  22 ऑगस्टला सामन्याचा निर्णय समोर आला. कारण 17 ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस होता तर 21 ऑगस्टरोजीही खेळ झाला नव्हता.  सामन्या इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 251 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पर्सी हॉर्नीब्रुकने उत्तम गोलंदाजी करत 31.2 ओव्हरमध्ये 92 धावा देत 7 फलंदाजाना बाद केलं. ज्यामुळेच सामन्यात ऑस्ट्रेलियाने 39 धावांनी विजय मिळवला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने  5 सामन्यांची मालिकाही 2-1 ने खिशात घातली.

1934 मध्येही 22 ऑगस्टलाच इंग्लंड पराभूत

1930 मधील पराभवानंतर 1934 मध्येही इंग्लंडसोबत असच काहीसं झालं. एशेज मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना ओवलच्याच मैदानावर 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत खेळवण्यात आला होता. या सामन्यातही 19 ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर तब्बल 708 धावांचा डोंगर उभा केला होता. ज्यानंतर 22 ऑगस्ट रोजी इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 145 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू क्लॅरी ग्रिमिटने उत्कृष्ट भूमिका पार पाडली. त्याने 26.3 ओव्हरमध्ये 64 धावा देत 5 विकेट घेतले. ज्यामुळे इंग्लंडला 22 ऑगस्टच्या दिवशी 1934 मध्ये तब्बल 562 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सोबतच इंग्लंडला 5 सामन्यांची मालिकाही 2-1 ने गमवावी लागील. अशाप्रकारे 1930 आणि 1934 मध्ये दोन्ही दिवशी 22 ऑगस्ट रोजी इंग्लंडला महत्त्वाचे सामने ज्यामुळे संपूर्ण मालिका गमवावी लागली होती.

हे ही वाचा

IND vs ENG : लॉर्ड्स कसोटीत अँडरसन बुमराहला नेमकं काय म्हणाला होता? ज्यानंतर बुमराह चवताळला, आश्विनने केला खुलासा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(In History of england cricket on this day 22nd august they lost ashes series in 1930 and 1934)