AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs KKR : फिन एलनचं वादळी शतक, केकेआरचा विजयी चौकार, दिल्लीचा 8 विकेट्सने धुव्वा

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Result and Highlights IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत करत 19 व्या मोसमात विजयी चौकार लगावला आहे. फिन एलन हा चौथ्या विजयाचा हिरो ठरला आहे.

DC vs KKR : फिन एलनचं वादळी शतक, केकेआरचा विजयी चौकार, दिल्लीचा 8 विकेट्सने धुव्वा
Finn Allen Century DC vs KKRImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 08, 2026 | 11:30 PM
Share

फिन एलन याने षटकारासह नाबाद शतक करुन कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल स्पर्धेच्या 51 व्या सामन्यात विजयी केलं आहे. केकेआरने यजमान दिल्ली कॅपिट्ल्सचा घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. दिल्लीने पाथुम निसांका याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआरसमोर 143 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने हे आव्हान 8 विकेट्स राखून आणि 34 बॉलआधी पूर्ण केलं. केकेआरने 14.2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. केकेआरचा हा एकूण आणि सलग चौथा विजय ठरला. तर दिल्ली कॅपिट्ल्सचा घरच्या मैदानात सलग पाचवा पराभव ठरला.

केकेआरची बॅटिंग

कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि फिन एलन या सलामी जोडीने 143 धावांचा पाठलाग करताना केकेआरला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर अजिंक्य आणि अंगकृष रघुवंशी ही मुंबईकर जोडी दुर्देवीरित्या आऊट झाली. अजिंक्य नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. अजिंक्यने 9 बॉलमध्ये 13 रन्स केल्या. तर अंगकृष रघुवंशी बोल्ड झाला. अंगकृषला 1 धाव करुन मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे केकेआरची 3.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 31 अशी स्थिती झाली.

तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी

त्यानंतर फिन एलन आणि कॅमरुन ग्रीन या जोडीने कमाल केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करुन केकेआरला विजयी केलं. फिन आणि ग्रीन या दोघांनी 64 बॉलमध्ये 116 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. कॅमेरुनने 27 बॉलमध्ये 122.22 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 33 रन्स केल्या. कॅमरुनने या दरम्यान 2 सिक्ससह लगावले.

तसेच फिन एलन हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. एलनने 47 बॉलमध्ये 212.77 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 100 धावा केल्या. फिनने या दरम्यान 10 षटकार आणि 5 चौकार लगावले. दिल्लीसाठी अक्षर पटेल याने एकमेव विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

दिल्लीची बॅटिंग

त्याआधी केकेआरने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीला केकेआरसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 142 धावांपर्यंतच पोहचता आलं. दिल्लीसाठी पाथुम निसांका याने सर्वाधिक 50 धावा केल्या. आशुतोष शर्मा याने 39 आणि केएल राहुल याने 23 धावांचं योगदान दिलं. तर इतरांपैकी एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. केकेआरकडून अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत