राष्ट्रगीत 52 सेकंदात पूर्ण करणं आवश्यक आहे का? श्रेया घोषालने गायल्यानंतर नव्या वादाला फोडणी? जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात गुवाहाटीत पार पडला. या सामन्यापूर्वी श्रेया घोषाल यांनी राष्ट्रगीत गायलं. त्याची स्तुती अनेक जण करत आहेत. पण नव्या वादाला फोडणी देखील मिळाली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

राष्ट्रगीत 52 सेकंदात पूर्ण करणं आवश्यक आहे का? श्रेया घोषालने गायल्यानंतर नव्या वादाला फोडणी? जाणून घ्या
राष्ट्रगीत 52 सेकंदात पूर्ण करणं आवश्यक आहे का? श्रेया घोषालने गायल्यानंतर नवा वादाला फोडणी? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Oct 01, 2025 | 10:14 PM

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत गायिका श्रेया घोषाल यांनी राष्ट्रगीत गायलं. तिच्या आवाजातील राष्ट्रगीत सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जण हे राष्ट्रगीत अभिमानाने शेअर करत आहेत. राष्ट्रगीत ऐकताना ऊर भरून येतो, असंही अनेकांनी म्हंटलं आहे. हा व्हिडीओ वीरू यादव या अधिकृत एक्स खात्यावरून शेअर केला गेला आहे. त्यावर त्यांनी इतिहासातील काही आठवणी जागा करून दिल्या आहेत. त्यांनी लिहिलं की हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. पहिल्यांदा त्यांची भाची सरला देवी चौधरीने गायलं. 1911 नंतर अनेकांना या राष्ट्रगीताला आपला आवाज दिला. पण आज श्रेया घोषाल यांनी राष्ट्रगीत गायलं तेव्हा असं वाटलं की त्यांनी राष्ट्रगीताला नवा जन्म दिला. खूप सुंदर आवाज आहे. श्रेया घोषाल यांनी राष्ट्रगीत 1 मिनिटं आणि 7 सेकंदात संपवलं. यावर भाविका कपूर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

भाविका कपूर यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, भारताच्या राष्ट्रगीतासाठी कडक नियम आहेत. ‘राष्ट्रगीत 52 सेकंदाच्या आत संपलं पाहीजे. गायनाची क्षमता दाखवण्यासाठी त्याचा वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न अयोग्य आणि स्थापित मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध आहे. वेग कमी करणे आणि वाढवणे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन मानले जाते आणि ते अनादर मानले जाऊ शकते.’ असं त्यांनी लिहिलं आहे. इतकंच काय तर त्यांनी पुढे लिहिलं की, ‘ क्रीडा स्पर्धांसारख्या काही विशिष्ट प्रसंगी अंदाजे 20 सेकंदाची संक्षिप्त आवृत्ती गाण्याची परवानगी आहे. पण राष्ट्रगीताच्या गतीमध्ये बदल करण्यास सक्त मनाई आहे. ही बाब गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.’

सोशल मीडियावरील या चर्चेने अनेकांना प्रश्न पडले आहेत. राष्ट्रगीताबाबत नेमके नियम काय आहेत. 20 सेकंद आणि 52 सेकंदाची मार्गदर्शक तत्व कधी लागू होतात. कधी गायलं जातं? वगैरे…

52 सेकंदाची आवृत्ती

जन-गण-मन अधिनायक जय हे,

भारत भाग्य विधाता,

पंजाब-सिन्धु-गुजरात-मराठा,

द्राविड़ उत्कल-बंग,

विंध्य हिमाचल यमुना गंगा,

उच्छल जलधि तरंग,

तब शुभ नामे जागे,

तब शुभ आशिष मांगे,

गाहे तब जय गाथा,

जन-गण-मंगलदायक जय हे,

भारत भाग्य विधाता,

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय जय हे.

संक्षिप्त आवृत्ती

जन-गण-मन अधिनायक जय हे

भारत-भाग्य विधाता.

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय जय हे.

गृह मंत्रालयाने राष्ट्रगीतासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. राष्ट्रगीताची पूर्ण आवृत्ती ही 52 सेकंदाची आहे. नियमानुसार, त्याची वेळ वाढवता येईल किंवा त्यापेक्षा जास्त वेळ घेतल्यास दंडाबाबत स्पष्ट काही उल्लेख नाही. नागरी आणि लष्करी सन्मान, शस्त्रास्त्र सलामी दरम्यान, परेड दरम्यान, औपचारिक राज्य समारंभात किंवा इतर सरकारी समारंभात राष्ट्रपतींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत गायलं जातं. दुसरी आवृत्ती संक्षिप्त स्वरूपात असून 20 सेंकदात गायली जाते. राष्ट्रगीताच्या पहिल्या आणि शेवटच्या ओळी काही खास प्रसंगी गायल्या जातात.